मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  सकाळचा नाश्ता असो वा इव्हनिंग स्नॅक्स, टेस्टी अन् हेल्दी ऑप्शन आहे रव्याचे आप्पे

सकाळचा नाश्ता असो वा इव्हनिंग स्नॅक्स, टेस्टी अन् हेल्दी ऑप्शन आहे रव्याचे आप्पे

Jun 15, 2022, 06:28 PM IST

    • नाश्त्या मध्ये साऊथ इंडियन फूड सगळ्यांनाच आवडते. इडली, डोसा नाही तर एकदा ट्राय करून पहा रव्याचे आप्पे. पहा ही सोपी रेसिपी.
रव्याचे आप्पे

नाश्त्या मध्ये साऊथ इंडियन फूड सगळ्यांनाच आवडते. इडली, डोसा नाही तर एकदा ट्राय करून पहा रव्याचे आप्पे. पहा ही सोपी रेसिपी.

    • नाश्त्या मध्ये साऊथ इंडियन फूड सगळ्यांनाच आवडते. इडली, डोसा नाही तर एकदा ट्राय करून पहा रव्याचे आप्पे. पहा ही सोपी रेसिपी.

साऊथ इंडियन फूड प्रेमी तर सर्वत्र पहायला मिळतात. इडली असो की डोसा, लोकांना साऊथ इंडियन पदार्थ खूप आवडतात. दरम्यान, आम्ही तुम्हाला आणखी एका डिशबद्दल सांगत आहोत जी बनवायला खूप सोपी आहे आणि जास्त वेळ लागत नाही. ही डिश सकाळचा नाश्ता पासून मुलांच्या टिफिन आणि संध्याकाळच्या चहासोबत नाश्त्यासाठी परफेक्ट आहे. आम्ही सांगत आहोत रव्यापासून बनवलेले आप्पे, ज्याला अप्पम देखील म्हणतात. हे बनवणे अगदी सोपे आहे. झटपट बनवणारी ही रेसिपी कशी बनवायची, जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

रव्याचे आप्पे बनवण्यासाठी आवश्यक साहित्यः

- रवा

- आंबट दही

- कांदा

- टोमॅटो

- सिमला मिरची

- हिरवी मिरची

- गाजर

- मीठ

- तेल

- कढीपत्ता

- मोहरी

 

रव्याचे आप्पे बनवण्याची विधीः

रव्याचे आप्पे बनवण्यासठी सर्वप्रथम एका बाऊल मध्ये रवा घ्या आणि त्यात आंबट दही टाका. चांगले मिक्स करून घ्या. आता हे काही वेळासाठी झाकून ठेवा. आता दुसरीकडे कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, हिरवी मिरची, गाजर हे सर्व बारीक कापून घ्या. आता या सर्व भाज्या रव्याच्या मिश्रणात टाका आणि मिक्स करून घ्या. यात थोडे मीठ टाका. आप्पे बनवण्यासाठी हे बॅटर धिरड्यांच्या बॅटरसारखे पातळ नसते. ते थोडेसे घट्ट असते, हे लक्षात ठेवा. रव्याच्या बॅटरमध्ये भाज्या आणि मीठ चांगले मिक्स करून घ्या.

आता आप्पे पॅनला गॅसवर मंद आचेवर गरम करायला ठेवा. आप्पे पॅनच्या सर्व साच्यांमध्ये थोडे थोडे तेल टाकून ग्रीस करून घ्या. आता त्या प्रत्येक साच्यांत थोडे तेल, मोहरी आणि कढीपत्ता टाका. नंतर त्यात रव्याचे बॅटर टाका. आता यावर झाकण ठेवून शिजू द्या. थोड्या वेळानंतर आप्पे चेक करा आणि ते पलटवून दुसऱ्या बाजूने शिजवा. दोन्ही बाजूने चांगले गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर काढून घ्या. तुमचे टेस्टी आणि हेल्दी आप्पे तयार आहे. तुम्ही हे टोमॅटो सॉस, नारळाची चटणी किंवा कोथिंबीरच्या हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

विभाग

पुढील बातम्या