मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri 2022 Recipe: बनवा साबुदाण्याचे लाडू! नवरात्रीच्या उपवासात स्वतःला ठेवा एनर्जेटिक

Navratri 2022 Recipe: बनवा साबुदाण्याचे लाडू! नवरात्रीच्या उपवासात स्वतःला ठेवा एनर्जेटिक

Sep 30, 2022, 01:20 PM IST

    • तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी साबुदाण्याच्या काही खास रेसिपी बनवा.
साबुदाण्याचे लाडू! (Freepik)

तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी साबुदाण्याच्या काही खास रेसिपी बनवा.

    • तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी साबुदाण्याच्या काही खास रेसिपी बनवा.

भारतात नवरात्रीला सुरुवात झाली आहे. यादरम्यान भक्त माता दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात. यासोबतच काही लोक उपवासही ठेवतात. या सलग ९ दिवस उपवास करणाऱ्यांना रोज काहीतरी वेगळे खावेसे वाटते. या नवरात्रीमध्ये स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असे पदार्थ खा. अशी आरोग्यदायी रेसिपी म्हणजे साबुदाणा लाडू. जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खाण्याचा कंटाळा आला असेल तर यावेळी साबुदाण्याच्या काही खास रेसिपी बनवा. चला तर मग जाणून घेऊया साबुदाणा लाडू बनवण्याची पद्धत.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

साबुदाण्याचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

एक कप साबुदाणा

एक कप साखर

एक कप तूप

वेलची पावडर

एक वाटी किसलेले खोबरे

काही बारीक चिरलेले ड्राय फ्रुट्स

साबुदाण्याचे लाडू कसे बनवायचे?

साबुदाण्याचे लाडू बनवण्यासाठी प्रथम गॅसवर तवा गरम करून घ्या.

त्यानंतर त्यात सुका साबुदाणा घालून मंद आचेवर शिजवा.

साबुदाणा थोडा फुगून हलका सोनेरी रंगाचा आणि कुरकुरीत झाला की गॅस बंद करून थंड होऊ द्या.

थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.

यानंतर एका पातेल्यात खोबरे टाकून ते तपकिरी होईपर्यंत तळा.

नंतर त्यात साबुदाणा आणि साखर नीट मिसळा. नंतर गॅस बंद करा.

आता कढईत तूप टाकून ड्रायफ्रूट्स २ मिनिटे तळून घ्या.

त्यानंतर त्यात साबुदाण्याचे मिश्रण टाका आणि वरून वेलची पूड टाका आणि मिक्स करा.

थंड झाल्यावर त्यातून लाडू बनवा.

साबुदाण्याचे लाडू तयार आहेत.

हे लाडू तुम्ही एअर टाईट डब्यात स्टोर करु शकता.

विभाग

पुढील बातम्या