मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Masala Oats Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला ओट्स, त्वरित मिळेल ऊर्जा!

Masala Oats Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा मसाला ओट्स, त्वरित मिळेल ऊर्जा!

Dec 30, 2022, 09:08 AM IST

    • Breakfast Recipe: कुटुंबातील मोठ्या सदस्यांसोबतच लहानांनाही हे मसाला ओट्स नक्कीच आवडतील.
मसाला ओट्स (Freepik)

Breakfast Recipe: कुटुंबातील मोठ्या सदस्यांसोबतच लहानांनाही हे मसाला ओट्स नक्कीच आवडतील.

    • Breakfast Recipe: कुटुंबातील मोठ्या सदस्यांसोबतच लहानांनाही हे मसाला ओट्स नक्कीच आवडतील.

नाश्ता नेहमी आरोग्यदायी असावा. यामुळे आळशीपणासोबतच भूकही संपते आणि दिवसभर काम करायला ऊर्जा मिळते . तुम्हाला तुमच्या रोजच्या नाश्त्यात काही नवीन पदार्थ ट्राय करायचे असतील तर ओट्स बनवा. आपल्या फिटनेसची काळजी घेणाऱ्यांसाठी ओट्स हा नाश्त्याचा उत्तम पर्याय आहे, ज्यामुळे झटपट ऊर्जा मिळते. पण जर तुम्हाला ओट्सची चव आवडत नसेल तर खास रेसिपीने तयार करा. कुटुंबातील मोठ्या सदस्यांसोबतच लहानांनाही हे ओट्स नक्कीच आवडतील. चला जाणून घेऊया मसाला ओट्स बनवण्याची रेसिपी...

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

मसाला ओट्स साठी साहित्य

एक वाटी ओट्स, दोन चमचे मटार, एक छोटा टोमॅटो, एक टेबलस्पून गाजर बारीक चिरून, एक छोटा कांदा, एक टीस्पून देशी तूप, हिरवी मिरची, जिरे, एक चतुर्थांश टीस्पून गरम मसाला, लाल तिखट, हळद, आले पेस्ट, लसूण पेस्ट, मीठ, पाणी.

मसाला ओट्स कसे बनवायचे?

> सर्वप्रथम गॅसवर तवा गरम करून त्यात ओट्स टाकून मंद आचेवर भाजून घ्या.

> एका प्लेटमध्ये ओट्स काढा आणि कढईत तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर जिरे घालून तडतडून द्या.

> त्यावर कांदा घाला आणि सोनेरी होईपर्यंत परता. कांदे सोनेरी झाल्यावर आले पेस्ट आणि लसूण पेस्ट घाला. लक्षात ठेवा गॅसची आच कमी असावी.

> कढईत बारीक चिरलेल्या भाज्या घाला, गाजर, वाटाणे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या घालून पाच ते दहा मिनिटे शिजवा.

> हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ एकत्र मिक्स करा.

> भाजलेले ओट्स आणि पाणी घालून ढवळावे. झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे तळून घ्या.

> ओट्स शिजल्यावर आणि पाणी सुकायला लागल्यावर गॅस बंद करा.

> स्वादिष्ट मसाला ओट्स तयार आहे, गरमागरम सर्व्ह करा.

नाश्त्यात मसाला ओट्स खाल्ल्याने दिवसभर एनर्जी टिकून राहते आणि पौष्टिकतेनेही भरपूर असते.

 

विभाग

पुढील बातम्या