मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kulhad Tea Recipe: बनारसी स्टाईलमध्ये बनवा चहा, पावसाची मज्जा करा द्विगुणित!

Kulhad Tea Recipe: बनारसी स्टाईलमध्ये बनवा चहा, पावसाची मज्जा करा द्विगुणित!

Sep 23, 2022, 09:06 AM IST

    • Banarasi style Tea: चहाप्रेमी चहा पिण्यासाठी निमित्त शोधत राहतात. त्यातही पाऊस हे एक उत्तम निमित्त आहे. 
बनारसी स्टाइल चहा (Freepik)

Banarasi style Tea: चहाप्रेमी चहा पिण्यासाठी निमित्त शोधत राहतात. त्यातही पाऊस हे एक उत्तम निमित्त आहे.

    • Banarasi style Tea: चहाप्रेमी चहा पिण्यासाठी निमित्त शोधत राहतात. त्यातही पाऊस हे एक उत्तम निमित्त आहे. 

पावसाळ्यात चहा पिण्याची मजा काही औरच असते. खास करून कुल्हड चहा मिळाला तर एकदम बेस्ट! घरी आपण रोज चहा बनवतो ज्यात पाणी उकळून त्यात साखर, चहा पावडर, आले आणि दूध वगैरे टाकले जाते. याच साहित्यासह, आपण काही वेगवेगळ्या प्रकारे चहा बनवू शकतो हे आपण पाहणार आहोत. या रेसिपीमध्ये तुम्हाला चहा-स्टॉलची चव मिळेल. याला चहा बनवण्याची बनारसी शैली देखील म्हणतात. उत्तर प्रदेशातील अनेक प्रसिद्ध चहाचे स्टॉल अशा प्रकारे चहा बनवतात. तुम्हीही हा मार्ग जाणून घ्या...

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

साहित्य

पाणी, आले, साखर, दूध, चहाची पाने, हिरवी वेलची, तुळशीची पाने (ऐच्छिक)

'असा' बनवा चहा

चहाच्या टपरीसारखा चहा बनवण्यासाठी गॅसवर पातेल्यात पाणी ठेवून त्यात आले आणि चहाची पाने टाकून उकळवा.

दुसऱ्या गॅसवर दूध गरम करायला ठेवा.

दुधात साखर आणि वेलची घालून मंद आचेवर उकळत रहा. तुळशीची पान टाकणार असाल तर पान नीट धुवून त्यात टाका.

दूध आणि पाणी दोन्ही वेगळ्या गॅसवर उकळू द्या.

जर तुमच्याकडे कुल्हड असेल तर ते पाण्याने चांगले धुवून पाण्याने भरून ठेवावे.

चहाची पाने असलेले पाणी आणि दूध चांगले उकळले की दोन्ही गॅस बंद करा.

आता कुल्हडमध्ये चहाचं पाणी घ्या आणि त्यावर उकळलेले दूध टाका.

प्रथम पाण्याचे प्रमाण कमी ठेवा आणि नंतर आवडीनुसार वाढवा.

पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर चांगले मिक्स करा. तुमचा चहा तयार आहे.

पुढील बातम्या