मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे पनीर ब्रेड रोल, झटपट होतात तयार

इव्हनिंग स्नॅक्ससाठी परफेक्ट आहे पनीर ब्रेड रोल, झटपट होतात तयार

Aug 31, 2022, 05:56 PM IST

    • संध्याकाळच्या चहासोबत काही तरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर ट्राय करा पनीर ब्रेड रोल.
पनीर ब्रेड रोल

संध्याकाळच्या चहासोबत काही तरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर ट्राय करा पनीर ब्रेड रोल.

    • संध्याकाळच्या चहासोबत काही तरी चटपटीत खायची इच्छा होत असेल तर ट्राय करा पनीर ब्रेड रोल.

Paneer Bread Roll Recipe : जर तुम्ही संध्याकाळी चहासोबत काही आरोग्यदायी आणि झटपट सोपी रेसिपी शोधत असाल तर क्रिस्पी आणि हेल्दी पनीर ब्रेड रोल ट्राय करुन पहा. या रेसिपीमध्ये तुम्हाला ब्रेडची क्रिस्पी टेस्ट, पनीरचा सॉफ्टनेस आणि चीजची चव या सर्व गोष्टी एकत्र मिळतील. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे लहानांपासून ते घरातील मोठ्यांना देखील हे खूप आवडेल. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून जाणून घेऊया कसे बनवायचे हे टेस्टी पनीर ब्रेड रोल.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

पनीर ब्रेड रोल बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- ६ स्लाइस ब्रेड

- १ कप पनीर

- कांदा

- १ टीस्पून आले आणि लसूण पेस्ट

- ४ क्यूब चीज

- २ टीस्पून लाल तिखट

- १/४ टीस्पून जिरे पावडर

- १/४ टीस्पून गरम मसाला

- २ टीस्पून टोमॅटो सॉस

- १/४ टीस्पून आमचूर पावडर

- कोथिंबीर

- चवीनुसार मीठ

- २ ते ३ चमचे तेल

- बटर

पनीर ब्रेड रोल कसा बनवायचा

पनीर ब्रेड रोल बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये थोडं बटर टाकून त्यात कांदा हलका परतून घ्या. त्यानंतर सर्व गोष्टी घालून नीट मिक्स करा. यानंतर कॉटेज चीज आणि पनीर घाला आणि गॅस बंद करा. स्टाफिंगसाठी पनीरचे सारण तयार आहे. आता ब्रेडच्या बाजू कापून काढा. रोलिंग पिनच्या मदतीने ब्रेड लांब आणि पातळ करा. आता त्यावर हलकी हिरवी चटणी टाका आणि सगळीकडे पसरवून घ्या. नंतर थोडेसे पनीरचे स्टफिंग घेऊन लांबीच्या दिशेने ठेवा. नंतर ब्रेडवर ठेवून रोल बनवा आणि काठावर पाणी ठेवून बंद करा. आता गॅसवर तवा ठेवा आणि त्यात हलके तेल टाका आणि ब्रेड रोल मध्यम आचेवर थोडा वेळ शिजू द्या. नंतर ब्रेडला ब्रशच्या सहाय्याने थोडेसे तेल लावून उलटे करून चारही बाजूंनी शिजवून घ्या. तुमचा ब्रेड रोल तयार आहे. गरमागरम चहा किंवा चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.

पुढील बातम्या