मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  तिखट खायचे शौकीन आहात, तर बनवा इंस्टंट मिरचीचे लोणचे

तिखट खायचे शौकीन आहात, तर बनवा इंस्टंट मिरचीचे लोणचे

Sep 22, 2022, 07:37 PM IST

    • Pickle Recipe : जे लोक तिखट जेवणाचे शौकीन असतात त्यांना कच्ची मिरची जेवणासोबत खायला आवडते. पण जर तुम्हाला नवीन काही ट्राय करायचे असेल तर तुम्ही झटपट मिरचीचे लोणचे बनवू शकता.
मिरचीचे लोणचे

Pickle Recipe : जे लोक तिखट जेवणाचे शौकीन असतात त्यांना कच्ची मिरची जेवणासोबत खायला आवडते. पण जर तुम्हाला नवीन काही ट्राय करायचे असेल तर तुम्ही झटपट मिरचीचे लोणचे बनवू शकता.

    • Pickle Recipe : जे लोक तिखट जेवणाचे शौकीन असतात त्यांना कच्ची मिरची जेवणासोबत खायला आवडते. पण जर तुम्हाला नवीन काही ट्राय करायचे असेल तर तुम्ही झटपट मिरचीचे लोणचे बनवू शकता.

Instant Chilli Pickle Recipe : काही लोकांना जेवणासोबत हिरवी मिरची खायला आवडते जेणेकरून जेवणाला चव येते. प्रत्येकाला आपापल्या चवीनुसार ते खायला आवडत असले तरी काहींना कच्च्या मिरच्या खायला आवडतात, तर काहींना तव्यावर भाजून खायला आवडतात. जर तुम्हाला तुमची चव बदलायची असेल आणि काहीतरी वेगळे खायचे असेल, तर तुम्ही त्यापासून झटपट लोणचे बनवू शकता. हे लोणचे पुरी किंवा पराठ्यासोबत खायला छान लागते. ते कसे बनवायचे हे जाणून घ्या

ट्रेंडिंग न्यूज

Coffee Face Pack: चेहऱ्याची हरवलेली चमक परत आणू शकतो कॉफी फेस पॅक, डागही होतील दूर

Mint Tea Benefits: पुदिन्याच्या चहाचा करा रूटीनमध्ये समावेश, पचनपासून वेट लॉसपर्यंत होईल मदत

Joke of the day : बायकोला फिरायला नेण्यासाठी जेव्हा नवरा त्याच्या बॉसकडं सुट्टी मागतो…

World Cocktail Day 2024: घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता कॉकटेल, ट्राय करा या ३ रेसिपी

मिरचीचे लोणचे बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- हिरवी मिरची

- मेथी पावडर

- राई पावडर

- बडीशेप पावडर

- हळद

- मीठ

- लिंबाचा रस

- मोहरीचे तेल

लोणचे कसे तयार करावे

हे बनवण्यासाठी प्रथम हिरवी मिरची धुवा आणि नंतर त्याचे लहान लहान तुकडे करा. आता ते एका बाऊलमध्ये काढा. नंतर मेथी पावडर, मोहरी पावडर, बडीशेप, हळद, मीठ घालून चांगले मिक्स करा. आता मोहरीचे तेल गरम करून त्यात मिरची टाका. नीट मिक्स करुन घ्या. नंतर त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. थंड झाल्यावर डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. पुरी आणि पराठ्यांव्यतिरिक्त मिरचीचे हे इंस्टंट लोणचे वरण-भात, कढी-भात सोबतही सर्व्ह करता येते. हे लोणचे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता. हे थंड हवामानात २ ते ३ दिवस चांगले राहते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला चटपटीत खावेसे वाटेल तेव्हा ही रेसिपी नक्की करून पहा.

 

विभाग

पुढील बातम्या