मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  संध्याकाळच्या चहासोबत घ्या गरमा गरम वाटाण्याच्या कचोरीचा आस्वाद

संध्याकाळच्या चहासोबत घ्या गरमा गरम वाटाण्याच्या कचोरीचा आस्वाद

Oct 11, 2022, 05:50 PM IST

    • Evening Snacks Recipe : संध्याकाळच्या थोड्याशा भुकेसाठी कचोरी एक चांगला ऑप्शन आहे. नेहमीची कचोरी न खाता आज ट्राय करुन पहा हिरव्या वाटाण्याची ही टेस्टी कचोरी.
हिरव्या वाटाण्याची कचोरी

Evening Snacks Recipe : संध्याकाळच्या थोड्याशा भुकेसाठी कचोरी एक चांगला ऑप्शन आहे. नेहमीची कचोरी न खाता आज ट्राय करुन पहा हिरव्या वाटाण्याची ही टेस्टी कचोरी.

    • Evening Snacks Recipe : संध्याकाळच्या थोड्याशा भुकेसाठी कचोरी एक चांगला ऑप्शन आहे. नेहमीची कचोरी न खाता आज ट्राय करुन पहा हिरव्या वाटाण्याची ही टेस्टी कचोरी.

Green Peas Kachori Recipe : पावसाळ्याचे दिवस असेल आणि नाश्त्यात गरमागरम कुरकुरीत हिरव्या वाटाण्याची कचोरी असेल तर त्याला तोडच नाही. हिरव्या वाटाण्याची कचोरी खायला जेवढी टेस्टी लागते तेवढीच ती बनवायलाही सोपी आहे. लहानांपासून मोठ्यांना या कचोरीची चव खूप आवडते. चला तर मग जाणून घेऊया कशी बनवायची स्वादिष्ट वाटाण्याची कचोरी.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

वाटाण्याची कचोरी बनवण्यासाठी साहित्य

- २ वाट्या मैदा

- दीड वाटी फ्रोजन हिरवे वाटाणे

- २-३ हिरवी मिरची (बारीक चिरलेली)

- १ टीस्पून आले पेस्ट

- १/४ टीस्पून लाल मिरची पावडर

- १/४ चमचा हळद

- १ टीस्पून धने पावडर

- १ टीस्पून बडीशेप पावडर

- १/२ टीस्पून आमचूर पावडर

- ४ मोठे चमचे देशी तूप

- १ टीस्पून मीठ

- चिमूटभर हिंग

- १/२ चमचा जिरेपूड

- रिफाइंड तेल (आवश्यकतेनुसार)

 

हिरवे वाटाण्याची कचोरी बनवण्याची पद्धत

हिरव्या वाटाण्याची कचोरी बनवण्यासाठी सर्वप्रथम कचोरीसाठी पीठ मळून घ्या. त्यासाठी प्रथम एका भांड्यात मैदा, थोडे मीठ आणि एक मोठा चमचा देशी तूप घालून चांगले मिक्स करावे. आता थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ बनवा. हे पीठ २० मिनिटे झाकून ठेवा आणि सेट करण्यासाठी ठेवा. पीठ मळताना हे लक्षात ठेवा की पीठ फक्त बांधून घ्यायचे आहे गुळगुळीत मॅश करायचे नाही, जर पीठ गुळगुळीत झाले तर तुम्हाला कचोर्‍या करणे कठीण होईल.

असे तयार करा कचोरीसाठी स्टफिंग

प्रथम एका कढईत थोडे रिफाइंड तेल टाकून त्यात हिरवी मिरची, हिंग, जिरेपूड, हळद, धनेपूड आणि बडीशेप टाकून हलके भाजून घ्या. आता वाटाणे, आमचूर पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून थोडे परतून घ्या आणि मिश्रण झाकून ४-५ मिनिटे मंद आचेवर शिजवा. यानंतर मटार चमच्याने मॅश करून थोडा वेळ भाजून घ्या. नंतर गॅस बंद करा आणि एका प्लेटमध्ये सारण काढा.

अशा प्रकारे मटारच्या कचोर्‍या बनवा

कचोर्‍यांसाठी तयार केलेल्या पिठाचे गोळे बनवा आणि एक एक करून थोडे लाटून घ्या. यानंतर, त्यात एक छोटा चमचा सारण ठेवा आणि ते सर्व बाजूंनी बंद करून पुन्हा रोल करा. त्याचप्रमाणे सर्व कचोऱ्या तयार करा. आता एका कढईत रिफाइंड तेल गरम करून त्यात सर्व कचोऱ्या तळून घ्या आणि त्या सोनेरी तपकिरी झाल्या की ताटात काढा. तुमच्या गरमागरम वाटाण्याच्या कचोऱ्या तयार आहेत. आता त्यांना हिरवी चटणी किंवा चहासोबत गरमागरम सर्व्ह करा.

 

विभाग

पुढील बातम्या