मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  हिरवी मिरची-लसूण चटणी वाढवेल जेवणाची लज्जत, ही आहे बनवण्याची आणि साठवण्याची पद्धत

हिरवी मिरची-लसूण चटणी वाढवेल जेवणाची लज्जत, ही आहे बनवण्याची आणि साठवण्याची पद्धत

Sep 08, 2022, 01:32 PM IST

    • कोथिंबीरची हिरवी चटणी तर तुम्ही नेहमीच खात असाल. पण ट्राय करुन पहा हिरवी मिरची आणि लसूणची ही चटणी.
हिरवी मिरची-लसूण चटणी

कोथिंबीरची हिरवी चटणी तर तुम्ही नेहमीच खात असाल. पण ट्राय करुन पहा हिरवी मिरची आणि लसूणची ही चटणी.

    • कोथिंबीरची हिरवी चटणी तर तुम्ही नेहमीच खात असाल. पण ट्राय करुन पहा हिरवी मिरची आणि लसूणची ही चटणी.

Chutney Recipe : कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी चटणी पुरेशी असते. हिरवी चटणी अगदी बेचव जेवणाची देखील चव वाढवते. हिरवी चटणी स्नॅक्ससोबत किंवा स्टफ पराठ्यासोबत छान लागते. काही लोकांना ते वरण भात किंवा भाजी पोळी सोबत खायला देखील आवडते. मात्र प्रत्येकाची ते बनवण्याची पद्धत वेगळी असते. येथे आम्ही लसूण घालून चटणी कशी बनवायची ते सांगत आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

Muskmelon for Skin: खरबूजची साल फेकू नका, अशा प्रकारे स्किन केअर मध्ये वापरा, फायदा होईल

Mother's Day Mocktails: मदर्स डे ला अल्कोहोल शिवाय तयार करा हे मॉकटेल, सोपी आहे रेसिपी

Ukhane For women: 'सासरचा गाव चांगला, गावामध्ये बंगला, बंगल्याला खिडकी...' नवऱ्यासाठी खास उखाणे

Mother's Day Celebration: आईसाठी मदर्स डे बनवा खास, अशा प्रकारे प्लॅन करा पूर्ण दिवस

हिरवी मिरची - लसूण चटणी कशी बनवायची

आवश्यक साहित्य

- कोथिंबीर

- लसूण

- हिरवी मिरची

- चिंच

- काळे मीठ

- जिरे पावडर

- मीठ

- हिंग

 

विधी

हिरवी चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम लसूण सोलून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. नंतर त्यात लसूण, हिरवी मिरची घालून परतून घ्या. आणि त्यात चिंचेचे काही तुकडे टाका आणि गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. आता हे मिश्रण कोथिंबीर, मीठ, हिंग घालून मिक्सर मध्ये बारीक करा. चांगली एकजीव पेस्ट तयार होईपर्यंत ग्राइंड करा. तुमची हिरवी मिरची - लसूण चटणी तयारआहे.

हिरवी चटणी कशी साठवायची (How To Store Green Chutney)

- हिरवी चटणी जास्त काळ साठवण्यासाठी ती बनवताना चटणीच्या भांड्यात एक छोटा चमचा ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचे तेल टाका.

- याशिवाय तुम्ही चटणी घट्ट काचेच्या डब्यातही ठेवू शकता.

- काही किचन हॅक्स चटणी बर्फाच्या ट्रेमध्ये साठवून फ्रीजमध्ये ठेवण्याबद्दल सांगतात. अशा परिस्थितीत तुम्ही हा हॅक करूनही पाहू शकता.

- एअर टाइट काचेच्या बरणीत चटणी साठवताना त्यात पाण्याचा थेंबही पडणार नाही याची काळजी घ्या.

 

विभाग

पुढील बातम्या