मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  पार्टनरसोबत करा या गोष्टी आणि फेस्टिव्ह सीझन लाइफ बनवा कलरफुल

पार्टनरसोबत करा या गोष्टी आणि फेस्टिव्ह सीझन लाइफ बनवा कलरफुल

Sep 30, 2022, 08:57 PM IST

    • जीवनाच्या धावपळीत तुमच्यावर अनेकदा अनेक दबाव आणि जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे तुम्हाला आयुष्य कंटाळवाणे वाटेल. या सणासुदीच्या काळात लाइफ अधिक कलरफुल करण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत या गोष्टी करा.
फेस्टिव्ह सीझन मध्ये पार्टनरसोबत करा या गोष्टी

जीवनाच्या धावपळीत तुमच्यावर अनेकदा अनेक दबाव आणि जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे तुम्हाला आयुष्य कंटाळवाणे वाटेल. या सणासुदीच्या काळात लाइफ अधिक कलरफुल करण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत या गोष्टी करा.

    • जीवनाच्या धावपळीत तुमच्यावर अनेकदा अनेक दबाव आणि जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे तुम्हाला आयुष्य कंटाळवाणे वाटेल. या सणासुदीच्या काळात लाइफ अधिक कलरफुल करण्यासाठी आपल्या पार्टनरसोबत या गोष्टी करा.

What To Do in Festive Season With Partner : रिलेशनशिप स्ट्राँग बनवण्यासाठी तुम्ही फक्त सहलीलाच जावं असं गरज नाही, तर छोट्या छोट्या प्रसंगीही तुम्ही तुमचा दिवस खास बनवू शकता. उदाहरणार्थ सणासुदीला खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अनेक गोष्टी करू शकता. जीवनाच्या धावपळीत, तुमच्यावर अनेकदा अनेक प्रकारचे दबाव आणि जबाबदाऱ्या असतात, ज्यामुळे तुम्हाला एकमेकांना हवा तसा वेळ देता येत नाही आणि लाइफ बोरिंग वाटू लागते. अशा परिस्थितीत सण तुम्हाला रुटीन लाईफला ब्रेक देऊन आराम देतात. याशिवाय मानसिक आरोग्य आणि मूड सुधारण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. चला, जाणून घ्या सणासुदीला खास बनवण्याच्या पद्धती

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

जोडीदारासोबत शॉपिंगला जा

शॉपिंग प्लॅन बनवण्यासाठी तुम्हाला मोठ्या बजेटची गरज नाही. तर काही गोष्टी खरेदी करण्याच्या उद्देशाने तुम्ही मार्केट एक्सप्लोर करू शकता. जोडीदारासोबत फिरल्यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल. त्याचबरोबर तुम्ही स्ट्रीट फूडचाही आस्वाद घेऊ शकता.

काहीतरी खास बनवा

बाहेर जाण्याव्यतिरिक्त तुम्ही स्पेशल पदार्थही बनवू शकता, पण स्वयंपाक तुम्हा दोघांना मिळून करावा लागेल. एकत्र स्वयंपाक करण्याची मजा काही औरच असते. जर तुमचा जोडीदार नवरात्रीचा उपवास करत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी उपवासाचे पदार्थ देखील बनवू शकता.

दसरा मेळावा किंवा जत्रा

टीव्ही किंवा चित्रपट पाहत असाल पण दसरा मेळावा किंवा रामलीला किंवा जत्रा पाहण्याची मजा काही औरच असते. जर तुम्ही तुमच्या बालपणीच्या दिवसांनंतर दसरा मेळावा पाहायला गेला नसाल तर यावेळी तुमच्या जोडीदारासोबत नक्की जा.

पार्टनरला सरप्राइज द्या

तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडीचे काहीतरी विकत घेऊ शकता आणि त्यांना देऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही पत्नी/प्रेयसीसाठी कानातले, दागिने खरेदी करून भेट देऊ शकता आणि पत्नी किंवा मैत्रिणीच्या आपल्या पार्टनरला कुर्ता, घड्याळ किंवा इतर कोणतीही वस्तू भेट देऊ शकता.

हँडीक्राफ्टसाठी वेळ काढा

स्वतःच्या हाताने वस्तू बनवल्याला किती दिवस झाले जरा आठवून पहा. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मिळून दिवाळीसाठी सजावटीच्या गोष्टी बनवू शकता. DIY गोष्टी बनवण्यासाठी तुम्ही युट्युबवर वर व्हिडिओ देखील पाहू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या