मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dahi Sandwich Recipe: रेगुलर सँडविचऐवजी ट्राय करा दही सँडविच! आहे झटपट तयार होणारी रेसिपी

Dahi Sandwich Recipe: रेगुलर सँडविचऐवजी ट्राय करा दही सँडविच! आहे झटपट तयार होणारी रेसिपी

Oct 30, 2022, 01:12 PM IST

    • Tea Time Snack Recipe: ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सँडविच देऊ शकता, तसेच प्रवासासाठीही उत्तम आहे.
दही सँडविच

Tea Time Snack Recipe: ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सँडविच देऊ शकता, तसेच प्रवासासाठीही उत्तम आहे.

    • Tea Time Snack Recipe: ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सँडविच देऊ शकता, तसेच प्रवासासाठीही उत्तम आहे.

बहुतेक लोकांना सँडविच आवडतात. हे चहासोबत किंवा नाश्ता म्हणून खाण्यासाठी उत्तम पदार्थ आहे. तुम्ही अनेक प्रकारे सँडविच बनवू शकता. येथे आम्ही दही सँडविचची रेसिपी सांगत आहोत. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, तसेच प्रवासासाठीही उत्तम आहे. जाणून घेऊयात दही सँडविच बनवण्याची सोपी आणि झटपट रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

दही सँडविच बनवण्यासाठी साहित्य

- हँग दही

- कांदा

- काकडी

- गाजर

- शिमला मिर्ची

- कोथिंबीर

- मीठ

- काळी मिरी पावडर

- चाट मसाला

- हिरवी चटणी

- ब्रेड स्लाइस

दही सँडविच कसं बनवायचं?

१) दही सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम दही सुती कापडात बांधून ठेवा. दह्यातील सर्व पाणी निघाल्यावर ते उघडा.

२) आता सर्व भाज्या नीट धुवून नंतर बारीक चिरून घ्या. आपण गाजर कद्दूकसही करू शकता.

३) सर्व भाज्या एका भांड्यात घ्या आणि नंतर त्यात दही घाला, चांगले मिसळा. नंतर त्यात मीठ आणि मिरी पावडर घाला.

४) ब्रेड स्लाइस घ्या आणि त्यावर हिरवी चटणी लावा. आता तयार मिश्रण लावा आणि नंतर दुसऱ्या ब्रेड स्लाइसने झाकून घ्या.

५) आता ते चांगले कापून घ्या आणि चवदार सँडविचचा आनंद घ्या.

 

विभाग

पुढील बातम्या