मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  टी टाइमचा परफेक्ट पार्टनर आहे कॉर्न पकोडा, ट्राय करा ही रेसिपी

टी टाइमचा परफेक्ट पार्टनर आहे कॉर्न पकोडा, ट्राय करा ही रेसिपी

Aug 18, 2022, 06:16 PM IST

    • कॉर्न खाण्याचे शौकीन लोकांना त्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला नेहमीच आवडतात. कॉर्नपासून बनवलेले स्नॅक्स टेस्टी असतात. असेच तुमच्या संध्याकाळच्या चहासोबत परफेक्ट आहे कॉर्न पकोडे.
कॉर्न पकोडा

कॉर्न खाण्याचे शौकीन लोकांना त्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला नेहमीच आवडतात. कॉर्नपासून बनवलेले स्नॅक्स टेस्टी असतात. असेच तुमच्या संध्याकाळच्या चहासोबत परफेक्ट आहे कॉर्न पकोडे.

    • कॉर्न खाण्याचे शौकीन लोकांना त्यापासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला नेहमीच आवडतात. कॉर्नपासून बनवलेले स्नॅक्स टेस्टी असतात. असेच तुमच्या संध्याकाळच्या चहासोबत परफेक्ट आहे कॉर्न पकोडे.

कॉर्न फूड प्रेमींना प्रत्येक स्वरूपात खायला आवडते. मग ते कणसाच्या फॉर्म मध्ये असो किंवा चटपटीत मसाल्यात बनलेले चाट. त्याची सौम्य गोड चव बहुतेकदा लोकांना आवडते आणि ते मोठ्या आवडीने खातात. काहींना भाज्या घालून बनवायलाही आवडतात. येथे आम्ही कॉर्न पकोड्यांची रेसिपी सांगत आहोत. ते कसे बनवायचे ते तुम्ही येथे शिकू शकता. कसे बनवायचे ते पहा.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

कॉर्न पकोडा बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- कॉर्न

- कांदा

- हिरवी मिरची

- लसूण

- मीठ

- लाल मिरची पावडर

- काळी मिरी पावडर

- ओरेगॅनो

- तांदळाचे पीठ

- चीज

- कॉर्नस्टार्च

- तेल

 

असे बनवा कॉर्न पकोडे

कॉर्न पकोडे बनवण्यासाठी प्रथम कॉर्न हलके उकळवा. कांदा, हिरवी मिरची, लसूण बारीक चिरून घ्या. आता एक बाऊल घेऊन त्यात कॉर्न, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण, मीठ, लाल तिखट, काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, तांदळाचे पीठ आणि चीज टाका. हे तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर तुम्ही हिरवी मिरचीस्किप करु शकता. तसेच चीज आवडत नसेल ते सुद्धा स्किप करु शकता. नंतर कोरडे मिश्रण चांगले मिक्स केल्यानंतर त्यात कॉर्नस्टार्च आणि पाणी टाकून बॅटर तयार करा. आता तवा गरम करून त्यात तेल घाला. नंतर थोडेसे पीठ घेऊन तव्यावर चांगले ओतावे. दोन्ही बाजूंनी शिजवा आणि नंतर सर्व्ह करा. यात कमी तेलाचा वापर केल्याने हे हेल्दी देखील आहे. तुम्ही हे टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडीच्या डीप सोबत सर्व्ह करु शकता. गरमा गरम चहा सोबत देखील टेस्टी लागतात.

विभाग

पुढील बातम्या