मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Banana Face Mask: केळीचा हा फेस मास्क काही मिनिटांतच त्वचेचा कोरडेपणा करेल दूर!

Banana Face Mask: केळीचा हा फेस मास्क काही मिनिटांतच त्वचेचा कोरडेपणा करेल दूर!

Jan 31, 2024, 11:51 AM IST

    • Skin Care Tips: हिवाळ्यातील थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचा निर्जीव दिसू लागतात. यावर घरगुती उपाय करू शकता.
how to make Banana Face Mask (freepik)

Skin Care Tips: हिवाळ्यातील थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचा निर्जीव दिसू लागतात. यावर घरगुती उपाय करू शकता.

    • Skin Care Tips: हिवाळ्यातील थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचा निर्जीव दिसू लागतात. यावर घरगुती उपाय करू शकता.

Winter Skin Care: गुलाबी थंडीचा ऋतू सुरु आहे. थंडी दिवसेंदिवस वाढत आहे. थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी (dry skin care) पडते. अनेकदा त्वचा निर्जीव दिसू लागतात. एवढं नाही तर हिवाळ्यात त्वचेला खाज सुटणे, त्यावर पांढरा थर तयार होणे, टाच फुटणे किंवा ओठ फुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. या बदलत्या ऋतूंमध्ये त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेच्या कोरडेपणाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरीच उपाय करू शकता. यासाठी तुम्ही केळीपासून बनवलेला मास्क (Banana Face Mask) वापरू शकता. केळीचा मास्क लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यास प्रभावी ठरू शकते. यामुळे तुमची त्वचा मऊ होईल.

ट्रेंडिंग न्यूज

International Day of Families: कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायचा असेल तर या ५ ठिकाणी फिरायला जा

Ice Cream Recipe: उन्हाळ्यात खूप टेस्टी लागते कॉफी आईस्क्रीम, जाणून घ्या सोपी रेसिपी

Health Care Tips: रस्त्यावरील उघडे अन्न, पाणीपुरी, आइस्क्रीममुळे मुलं पडताय आजारी, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

Garlic Peel Benefits: लसूण सोलल्यावर त्याचे साल फेकू नका, मिळतात हे आश्चर्यकारक फायदे

लागणारे साहित्य

१ केळी

३ चमचे कच्चे दूध

एक चिमूटभर हळद

अर्धा चमचे मध

कसा बनवायचा मास्क?

केळीचा मास्क तयार करण्यासाठी पिकलेली केळी घ्या. ही केळी पूर्णपणे मॅश करा. केळी मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते. आता त्यात कच्चे दूध घाला. त्वचा तेलकट असेल तर दुधाऐवजी गुलाबजल निवडू शकता. आता त्यात हळद आणि मध टाका. सर्व साहित्य चांगले मिसळा. तुमचा पॅक तयार आहे.

कसा करायचा वापर?

सर्वप्रथम केळीचा फेस मास्क लावण्यापूर्वी चेहरा धुवून घ्या. यानंतर, तयार केलेला फेस मास्क तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर पूर्णपणे लावा. साधारण १० ते १५ मिनिटे हा फेस पॅक चेहऱ्यावर राहुद्यात. नीट कोरडे होऊ द्यात. यानंतर, कॉटन बॉल आणि पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा. सर्वोत्तम परिणामांसाठी, हा फेस मास्क आठवड्यातून २ वेळा वापरा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या