मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Navratri 2022 Recipe: नवरात्रीच्या उपवासाला बनवा पौष्टिक व चवदार सफरचंद खीर

Navratri 2022 Recipe: नवरात्रीच्या उपवासाला बनवा पौष्टिक व चवदार सफरचंद खीर

Sep 26, 2022, 10:02 AM IST

    • Apple Kheer: या खीरेच्या सेवनाने पोट भरण्यासोबतच शरीरातील उर्जा पातळीही टिकून राहते. जाणून घ्या 'सफरचंद खीर' बनवण्याची सोपी रेसिपी.
सफरचंद खीर (Freepik)

Apple Kheer: या खीरेच्या सेवनाने पोट भरण्यासोबतच शरीरातील उर्जा पातळीही टिकून राहते. जाणून घ्या 'सफरचंद खीर' बनवण्याची सोपी रेसिपी.

    • Apple Kheer: या खीरेच्या सेवनाने पोट भरण्यासोबतच शरीरातील उर्जा पातळीही टिकून राहते. जाणून घ्या 'सफरचंद खीर' बनवण्याची सोपी रेसिपी.

आजपासून म्हणजेच २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. यावेळी दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाणार आहे. तसेच अनेक भाविक नऊ दिवस कडक उपवास करतील. अशा स्थितीत उपवास ठेवताना फळांच्या आहारात कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. फळे खाताना अशा गोष्टींचे सेवन केले पाहिजे की पोट भरण्यासोबतच शरीरातील उर्जा पातळीही टिकून राहते. यावेळी तुम्हीही नवरात्रीचा उपवास करणार असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी पौष्टिकतेने परिपूर्ण ' सफरचंद खीर'ची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया ' सफरचंद खीर ' बनवण्याची सोपी रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

खीर बनवण्यासाठी साहित्य

२ सफरचंद, सोललेली आणि किसलेली

३ टेस्पून कंडेन्स्ड दूध

२ ग्लास दूध

१/२ कप बदाम चिरलेले

८ ते १० मनुका

१ चमचा तूप

१ टीस्पून वेलची पावडर

१/२ टीस्पून साखर

कशी बनवायची खीर?

सर्व प्रथम कढईत तूप टाकून गरम करा. तूप वितळायला लागल्यावर त्यात चिरलेली सफरचंद घालून मंद आचेवर शिजवा.

सफरचंदाचे पाणी पूर्णपणे कोरडे होईपर्यंत शिजवा. सफरचंदाचे पाणी सुकल्यावर गॅस बंद करा.

आता एक वेगळे पॅन घ्या आणि त्यात दूध मंद आचेवर उकळा.

दूध उकळायला लागल्यावर आग मंद करा आणि घट्ट होण्यासाठी सुमारे १० मिनिटे गरम होऊ द्या.

दुधाला चांगली उकळी आली की त्यात कंडेन्स्ड मिल्क टाका.

साधारण पाच मिनिटे शिजू द्या.

आता त्यात चिरलेले बदाम आणि वेलची पूड टाका, नीट मिक्स करा आणि नंतर सुमारे तीन मिनिटे शिजू द्या.

आता दूध थंड होण्यासाठी ठेवा. दूध थंड झाल्यावर त्यात शिवजलेले सफरचंद आणि मनुका घाला.

सफरचंदाची खीर तयार आहे.

विभाग

पुढील बातम्या