मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Silky Hair: प्रदूषणामुळे खराब झालेत केस? स्मूथ-सिल्की हेअरसाठी फॉलो करा या नॅचरली पद्धती

Silky Hair: प्रदूषणामुळे खराब झालेत केस? स्मूथ-सिल्की हेअरसाठी फॉलो करा या नॅचरली पद्धती

Jan 22, 2023, 08:20 PM IST

    • Hair Care tips: केसांची योग्य काळजी न घेतल्यास ते कोरडे आणि निर्जीव होतात. त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकता.
हेअर केअर टिप्स

Hair Care tips: केसांची योग्य काळजी न घेतल्यास ते कोरडे आणि निर्जीव होतात. त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकता.

    • Hair Care tips: केसांची योग्य काळजी न घेतल्यास ते कोरडे आणि निर्जीव होतात. त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करू शकता.

Natural Ways to Get Smooth and Silky Hair: सुंदर केसांची इच्छा कोणाला नसते? केस सुंदर असतील तर माणसाच्या सौंदर्याला चार चाँद लागतात. कोणताही लूक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी हेअरस्टाइल खूप महत्त्वाची असते. पण अनेक कारणांमुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. या प्रकारच्या केसांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. काही नैसर्गिक पद्धतींनी तुम्ही तुमचे केस स्मूथ आणि सिल्की बनवू शकता. रेशमी आणि चमकदार केस मिळविण्यासाठी, येथे पहा नॅचरल हेअर केअर टिप्स

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

पहिली पद्धत

नारळाचे दूध केसांसाठी खूप चांगले आहे. म्हणून नारळाच्या दुधात एरंडेल तेल मिक्स करा आणि नंतर चांगला पॅक बनवा. आता ते ओलसर केसांवर काही वेळ लावा. नंतर एक टॉवेल गरम पाण्यात भिजवा आणि नंतर तो पिळून घ्या आणि केसांना गुंडाळून २० मिनिटे ठेव. वेळ संपल्यानंतर केस धुवा.

दुसरी पद्धत

केस स्मूथ करण्यासाठी एलोवेरा जेल आणि अर्धा कप ऑलिव्ह ऑइल चांगले मिक्स करा. आता हे मिश्रण ओलसर केसांवर ३० मिनिटे लावा. नंतर एक टॉवेल कोमट पाण्यात भिजवा आणि नंतर तो पिळून घ्या आणि १० मिनिटे केसांना लावा. वेळ संपल्यानंतर केस धुवा. ते असेच राहू द्या आणि नंतर पूर्णपणे शॅम्पू करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या