मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  मुलांना अभ्याचा कंटाळा येतो? असे सजवा त्यांचे स्टडी टेबल

मुलांना अभ्याचा कंटाळा येतो? असे सजवा त्यांचे स्टडी टेबल

Sep 17, 2022, 09:22 PMIST

Tips To Decorate Study Table: मुलांना अभ्यासाचा खूप कंटाळा येतो. पण त्यांचा स्टडी टेबल, रुम चांगले सजवले तर त्यांना अभ्यास करताना मजा येईल आणि ते जास्त वेळ अभ्यास करतील.

  • Tips To Decorate Study Table: मुलांना अभ्यासाचा खूप कंटाळा येतो. पण त्यांचा स्टडी टेबल, रुम चांगले सजवले तर त्यांना अभ्यास करताना मजा येईल आणि ते जास्त वेळ अभ्यास करतील.
आजकाल बहुतेक पालक आपल्या मुलांची तक्रार करतात की त्यांना अभ्यास अजिबात आवडत नाही. अशा पालकांच्या यादीत तुमचाही समावेश असेल, तर तुमच्या पाल्याचं मन अभ्यासात रुजवण्यासाठी त्याचं अभ्यासाचं टेबल अशा प्रकारे सजवा. अभ्यासाचे टेबल सजवताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास पालक मुलांची अभ्यासात रुची वाढवू शकतात.
(1 / 7)

अभ्यासाच्या खोलीसाठी एकांत जागा तयार करा - मुलांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, त्यांची अभ्यासाची खोली घराच्या अशा ठिकाणी बनवणे आवश्यक आहे, जिथे त्यांना कोणताही त्रास होणार नाही. अशा परिस्थितीत मुलांच्या अभ्यासाच्या खोलीसाठी तुम्ही निर्जन जागा निवडू शकता. पण हे करत असताना लक्षात ठेवा की बाथरूमच्या शेजारी स्टडी रूम बांधू नका.
(2 / 7)

महत्त्वाच्या गोष्टी टेबलावर ठेवा - मुलांच्या टेबलावर ठेवलेल्या महत्त्वाच्या गोष्टींमुळे त्यांची अभ्यासाची आवड वाढू शकते. अशा परिस्थितीत मुलांच्या अभ्यासाच्या टेबलाला आकर्षक लूक देण्यासाठी टेबलावर टेबल लॅम्प ठेवा.
(3 / 7)

स्टडी टेबलसाठी प्रकाश असलेली जागा निवडा - स्टडी टेबल खिडकीजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांना पुरेसा प्रकाश मिळेल आणि मुलांना कंटाळा येणार नाही.
(4 / 7)

भिंतीवर मोटिव्हेशनल कोट्स लावा - मुलांची खोली आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही भिंतींवर रंगीबेरंगी मोटिव्हेशनल स्टिकर्स देखील चिकटवू शकता.
(5 / 7)

पुस्तके सांभाळून ठेवा - अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी मुलांची खोली स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवली पाहिजे. मुलांना शाळेतून आल्यानंतर पुस्तके फेकण्याऐवजी पुस्तकांच्या रॅकमध्ये व्यवस्थित ठेवण्याचा सल्ला द्या.
(6 / 7)

खोलीचा रंगही महत्त्वाचा - मुलांना अभ्यासात रस असायला हवा, यामध्ये त्यांच्या अभ्यासाच्या खोलीच्या रंगाचाही मोठा हात असतो. मुलांचा अभ्यासाचा मूड टिकवून ठेवण्यासाठी ब्राईट कलरची रंगाची भिंत तयार करा. डार्क कलरच्या खोलीत मुलांना वाचणे कठीण होऊ शकते.
(7 / 7)

    शेअर करा