मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  पार्टनरच्या निर्णयाने खूश नाही? न भांडता असे करा डील

पार्टनरच्या निर्णयाने खूश नाही? न भांडता असे करा डील

Sep 28, 2022, 09:03 PM IST

    • अनेक वेळा आपल्याला पार्टनरने घेतलेला निर्णय आवडत नाही. अशा वेळी ही सिच्युएशन डील करण्यासाठी फॉलो करा या टिप्स.
रिलेशनशिप टिप्स

अनेक वेळा आपल्याला पार्टनरने घेतलेला निर्णय आवडत नाही. अशा वेळी ही सिच्युएशन डील करण्यासाठी फॉलो करा या टिप्स.

    • अनेक वेळा आपल्याला पार्टनरने घेतलेला निर्णय आवडत नाही. अशा वेळी ही सिच्युएशन डील करण्यासाठी फॉलो करा या टिप्स.

How to Deal with Partner Wrong Decision : दोन लोकांनी एकत्र राहणे म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांचे विचार सारखे असतील. बहुतेक कपल्सचे विचार एकमेकांपेक्षा खूप वेगळे असतात, तरी दोघेही जुळवून घेतात. पण कधी कधी असे होते की जोडीदार असा निर्णय घेतो, जे पाहून तुम्हाला खूप राग येतो. तुम्हाला जर दिसत असेल की त्याच्या या निर्णयाने तुमचे रिलेशनशिप खराब होईल आणि तुमच्या पार्टनच्या पर्सनॅलिटीवर देखील याचा परिणाम होईल. तर अशा परिस्थितीला तुम्ही कसे डील करु शकता, ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

जोडीदाराशी बोला

सर्वात पहिला स्टेप म्हणजे तुमच्या जोडीदाराशी बोलणे. त्यांच्याशी बोला आणि त्यांच्या निर्णयामुळे तुम्हाला कोणती समस्या आहे आणि हा निर्णय तुमच्या दोघांसाठी कसा योग्य नाही हे स्पष्ट करा. बोलल्याने कदाचित त्यांना तुमचा मुद्दा समजेल.

तुमच्या जोडीदाराचे ऐका

असे देखील होऊ शकते की तुम्ही जोडीदाराचा दृष्टिकोन नीट समजून घेऊ शकला नाही. अशा परिस्थितीत तुम्हीही त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे की त्यांनी कोणताही निर्णय का घेतला? हे तुम्हाला निर्णय घेणे देखील सोपे करेल.

अचानक रिअॅक्ट होऊ नका

तुम्हाला जर ऐकल्यानंतर राग येत असेल तर या प्रकरणावर अचानक रिअॅक्ट होऊ नका. यामुळे तुमच्या दोघांचे नाते बिघडू शकते. तुम्ही आधी शांतपणे ऐका आणि मग शेवटी तुमचा मुद्दा सहज सांगा तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटते.

वेळ घ्या

जर तुम्हाला जास्त राग आला तर तुम्ही वेळ घेऊन विचार केला पाहिजे. अशा स्थितीत पार्टनरला सांगा की तुम्हाला याविषयी आत्ताच काही बोलायचे नाही किंवा थेट बोलण्यात काही अडचण येत असेल तर आणखी काही सांगूनही तुम्ही गोष्ट फिरवू शकता. यामुळे तुमचा रागही शांत होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या