मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sore Throat: थंडीमुळे घसा खवखवतोय? या घरगुती उपायांचा अवलंब करा!

Sore Throat: थंडीमुळे घसा खवखवतोय? या घरगुती उपायांचा अवलंब करा!

Jan 07, 2024, 11:48 PM IST

    • Home Remedies: हिवाळ्यात सर्दी खोकला यासारखे आजार होतात. यामुळे घसा खवखवतो. यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.
home remedies for Sore Throat (freepik)

Home Remedies: हिवाळ्यात सर्दी खोकला यासारखे आजार होतात. यामुळे घसा खवखवतो. यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

    • Home Remedies: हिवाळ्यात सर्दी खोकला यासारखे आजार होतात. यामुळे घसा खवखवतो. यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

Winter Care Tips: हिवाळ्यात काही आजार होणे फार सामान्य आहे. सर्दी आणि ताप हे दोन्ही आजार फार कॉमन आहेत. सर्दीनंतर तर खवखवणे किंवा तीव्र घसा दुखतो. अनेक वेळा ओरडल्यामुळे किंवा खाण्याच्या सवयी बदलल्यामुळेही घसा खवखवतो. काहींना कडाक्याच्या थंडीमुळे घसादुखीच्या समस्येलाही सामोरे जावे लागते. कधी कधी थंडीत पाणी प्यायल्यानेही घशात जळजळ होते. खूप थंड पदार्थ खाल्ल्याने विशेषतः हिवाळ्यात ही समस्या उद्भवते. यावर तुम्ही घरगुती उपाय करू शकता. ज्यामुळे घशात पटकन आराम मिळेल.

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

दालचिनी

दालचिनी घशासाठी फायदेशीर ठरते. जर तुमचा घसा दुखत असेल तर दालचिनी वापरा. यासाठी दालचिनी पावडर १ चमचे मधात मिसळा आणि खा.

काळी मिरी खा

काळी मिरी घशातील समस्या दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. यासाठी १ चमचा काळी मिरी पावडर घ्या आणि त्यात १ चमचा मध मिसळा. हे मिश्रण चाटा. पण लक्षात ठेवा नंतर अर्धा तास त्यावर पाणी पिऊ नका. काळी मिरी टाकून चहाही बनवता येईल.

आल्याचा करा वापर

आल्याचा वापर घसादुखीवर वर्षानुवर्षे केला जातो. आल्यामध्ये असे घटक असतात जे घसादुखीपासून आराम देतात. आल्याचे काही तुकडे दुधात टाकून गरम गरम प्या. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर

एक ग्लासात कोमट पाण्यात १ चमचे अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळून पिल्यास आराम मिळेल.

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

घशाच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्याचा एक अतिशय सोपा आणि बेस्ट उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे. यामुळे घसा खवखवण्याची समस्या दूर होईल. यासाठी एका ग्लासमध्ये थोडे गरम पाणी घेऊन त्यात मीठ टाका. आता या पाण्याने दिवसातून किमान २-३ वेळा गुळण्या करा. तुम्हाला लवकर आराम मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या