मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Good Morning Wishes: दिवसाची सुरुवात करा या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजसह; व्हॉट्सअप स्टेटसलाही ठेवा!

Good Morning Wishes: दिवसाची सुरुवात करा या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजसह; व्हॉट्सअप स्टेटसलाही ठेवा!

Nov 30, 2022, 08:59 AM IST

    • Motivational Messages: नवीन दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सकारात्मक संदेशाने झाली की संपूर्ण दिवस चांगला जातो.
गुड मॉर्निंग

Motivational Messages: नवीन दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सकारात्मक संदेशाने झाली की संपूर्ण दिवस चांगला जातो.

    • Motivational Messages: नवीन दिवसाची सुरुवात चांगल्या आणि सकारात्मक संदेशाने झाली की संपूर्ण दिवस चांगला जातो.

Good Morning Wishes In Marathi: आजकालच्या व्यस्त जीवनात कामामुळे किंवा अन्य गोष्टींमुळे कमी झोप मिळते. सहाजिकच यामुळे तणाव निर्माण होतो. अशा परिस्थितीत, चांगल्या दिवसाच्या सुरवातीसाठी काही तरी मोटीव्हेशनल हवं असत. आपल्या दिवसाची सुरवात नेहमी चांगल्या आणि आनंददायी वातावरणात झाली पाहिजे अशी आपल्या सर्वांची इच्छा असते. यासाठीच तुमच्या सोमवारची सुरुवात उत्तम जावो आणि आठवड्याचा पहिला दिवस चांगला जावो या इच्छेसह, आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर प्रेरणादायी सुप्रभात संदेश घेऊन आलो आहोत. हे संदेश केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या प्रियजनांसाठीही दिवस खास बनवतील. आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक दिवस आपल्यासमोर नवीन आव्हान घेऊन येतो. जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर दिवस उत्साहात जातो. म्हणूनच तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुंदर गुड मॉर्निंग संदेश ठेवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

१) खेळ’ असो वा ‘आयुष्य’

आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा

जेव्हा समोरचा

आपल्याला “कमजोर” समजत असेल.

शुभ सकाळ!!

 

२) चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि

चांगले विचार असणारे लोक

नेहमी आठवणीत राहतात..

मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही

शुभ सकाळ!!

 

३) मैदानात हरलेला माणूस

पुन्हा जिंकू शकतो..

पण मनातून हरलेला माणूस

कधीच जिंकू शकत नाही..

शुभ सकाळ!!

 

४)जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,

तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा

टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..

सुप्रभात!!

 

५) सुख ही एक मानसिक सवय आहे,

ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.

तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,

तितकंच सुखी तुम्ही रहाल.

तुमच्या सुखी रहाण्यावर

केवळ तुमचाच अधिकार असतो.

इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत

ही गोष्ट एकदा लक्षात आली

की जगणं फार सोपं होऊन जाईल…

सुप्रभात!!

 

विभाग

पुढील बातम्या