मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Gold Silver Price:नवरात्रौत्सवाच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात कोणताही बदल नाही!

Gold Silver Price:नवरात्रौत्सवाच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदीच्या दरात कोणताही बदल नाही!

Sep 27, 2022, 08:07 AM IST

    • Gold Silver Price Today 27rd September 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये नेहमीच चढ-उतार दिसून येतात. जाणून घ्या देशातील मुख्य शहरातील आजचा भाव.
आजचा सोने-चांदीचा भाव (Reuters)

Gold Silver Price Today 27rd September 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये नेहमीच चढ-उतार दिसून येतात. जाणून घ्या देशातील मुख्य शहरातील आजचा भाव.

    • Gold Silver Price Today 27rd September 2022: सोने-चांदीच्या किमतीमध्ये नेहमीच चढ-उतार दिसून येतात. जाणून घ्या देशातील मुख्य शहरातील आजचा भाव.

Gold Silver Price on Navaratri 2022: कालपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात अनेकजण या शुभ दिवशी सोने-चांदी खरेदी करतात. तुमचंही असंच नियोजन असेल तर आजचे मौल्यवान धातूंचे नवीनतम दर जाणून घ्या. सराफा बाजारात मौल्यवान धातूंच्या दरात सतत चढ-उतार दिसून येतात. आज देशातील किरकोळ बाजारात सोने-चांदीच्या दरात काहीही फरक नाही. देशात २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,००० आहे, आदल्या दिवशी ही किंमत ४६,००० रुपयेच होती तर, आज २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,२०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीची सरासरी किंमत ५६,८०० रुपये प्रति किलो झाली आहे.उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा
ट्रेंडिंग न्यूज

Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Trending News : मुंबईचा डान्सर पोलीस कॉन्सटेबल अमोल कांबळेचा जर्मन TikToker नोएल रॉबिन्सनसोबत धम्माल डान्स पाहिला का?

धक्कादायक..! लग्नास नकार दिल्याने मुलीच्या संपूर्ण कुटूंबालाच संपवले, ५ जणांची हत्या करून तरुणाने घेतला गळफास

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर

चेन्नई         : ४६,७०० (२२ कॅरेट), ५०,९५० (२४ कॅरेट)

मुंबई         : ४६,५०० (२२ कॅरेट), ५०,७३० (२४ कॅरेट)

दिल्ली       : ४६,६५० (२२ कॅरेट), ५०,८९० (२४ कॅरेट)

कोलकाता : ४६,५०० (२२ कॅरेट), ५०,७३० (२४ कॅरेट)

जयपूर      : ४६,६५० (२२ कॅरेट), ५०,८९० (२४ कॅरेट)

लखनऊ   : ४६,६५० ( २२ कॅरेट), ५०,८९० (२४ कॅरेट)

पाटणा     : ४६,५३० (२२ कॅरेट), ५०,७६० (२४ कॅरेट)

पुणे          : ४६,५३० (२२ कॅरेट), ५०,७६० (२४ कॅरेट)

नागपूर     : ४६,५३० (२२ कॅरेट), ५०,७६० (२४ कॅरेट)

नाशिक    : ४६,५३० ( २२ कॅरेट), ५०,७६० (२४ कॅरेट)

चांदीची आजची किंमत

आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. आज सरासरी किंमत ५६,८०० रुपये प्रति किलो आहे. प्रमुख शहरांबद्दल बोलायचे झाल्यास मुंबई, दिल्ली, लखनऊ आणि पटना मध्येही किंमत ५६,८०० रुपये प्रति किलो आहे तर चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, विजयवाडा इत्यादी दक्षिणेकडील शहरांमध्ये किंमत ६२,५०० रुपये प्रति किलो आहे.

(सोन्या-चांदीच्या दिलेल्या किमती सूचक आहेत. यात जीएसटी किंवा इतर कोणत्याही कराचा समावेश नाही.)

‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

१. सोन्याच्या दागिन्यांमध्ये, ज्वेलर्स स्वतंत्रपणे मेकिंग चार्जेस आकारतात. खरेदी करताना ही माहिती आवर्जून घ्या.

२. खरेदी करताना रिटर्न पॉलिसीबद्दल माहिती घ्या.

३. सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग कायद्याने बंधनकारक आहे. खरेदी करताना हॉलमार्किंगची खात्री करा. हॉलमार्किंग गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी देते.

 

विभाग

पुढील बातम्या