मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  फक्त वेट लॉसच नाही तर सर्दी-फ्लूपासूनही आराम देतो भाजलेला ओवा, होतात अनेक फायदे

फक्त वेट लॉसच नाही तर सर्दी-फ्लूपासूनही आराम देतो भाजलेला ओवा, होतात अनेक फायदे

Jan 08, 2023, 01:58 PM IST

    • ओवा तुम्हाला फक्त पचनच नाही तर सर्दी आणि फ्लू सोबत तुमचे वाढते वजनही नियंत्रित करू शकते. जाणून घेऊया भाजलेला ओवा खाल्ल्याने काय फायदे होतात.
भाजलेल्या ओव्याचे फायदे

ओवा तुम्हाला फक्त पचनच नाही तर सर्दी आणि फ्लू सोबत तुमचे वाढते वजनही नियंत्रित करू शकते. जाणून घेऊया भाजलेला ओवा खाल्ल्याने काय फायदे होतात.

    • ओवा तुम्हाला फक्त पचनच नाही तर सर्दी आणि फ्लू सोबत तुमचे वाढते वजनही नियंत्रित करू शकते. जाणून घेऊया भाजलेला ओवा खाल्ल्याने काय फायदे होतात.

Health Benefits of Roasted Ajwain or Celery Seeds: हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला यासारख्या समस्या लोकांना त्रास देऊ लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही सर्दी-पडसाबरोबरच तुमच्या वाढत्या वजनाने त्रस्त असाल, तर भाजलेला ओवा तुम्हाला तुमच्या समस्यांवर मात करण्यास मदत करू शकतो. होय, तुम्ही आजपर्यंत अनेक वेळा ओव्याचा वापर अन्नाचा सुगंध वाढवण्यासाठी आणि तुमची पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी केला असेल, पण तुम्हाला माहित आहे का की ओवा तुमच्या पचनासाठी फायदेशीर तर आहेच पण सर्दी आणि फ्लू सोबतच तुमचे वाढते वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. चला जाणून घेऊया भाजलेला ओवा खाल्ल्याने माणसाला कोणते आश्चर्यकारक फायदे होतात.

ट्रेंडिंग न्यूज

Ovarian Cancer: वेळेवर तपासणी केल्याने ओव्हेरियन कॅन्सरवर मात करणे शक्य, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Kadhi Recipe: उडीद आणि बेसन घालून बनवा छत्तीसगडची प्रसिद्ध कढी, झटपट तयार होते ही रेसिपी

Thick Eyelashes: पापण्या दाट आणि लांब करण्यासाठी करा हे उपाय, वाढेल डोळ्यांचे सौंदर्य

Halim Seeds: वेट लॉस ते मासिक पाळी; महिलांच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहेत अळीवाच्या बिया! वाचा याचे फायदे

ओव्यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी-इंफ्लामेटरी गुणधर्म आहेत, जे शरीराला अनेक रोगांपासून वाचवतात आणि संसर्ग कमी करून वेदना कमी करतात. एवढेच नाही तर वजन कमी करण्यासाठी लोक ओव्याचे पाणी आणि ओव्याच्या पावडरचा वापर करतात.

भाजलेला ओवा खाण्याचे फायदे

वेट लॉस

भाजलेला ओवा पोटातील एन्झाइम्स वाढवून पचनक्रिया जलद करण्याचे काम करते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे. हा उपाय करण्यासाठी ओवा, मेथी आणि बडीशेप समप्रमाणात भाजून घ्या आणि एकत्र करून सेवन करा. हे मिश्रण साठवण्यासाठी हवाबंद डब्यात ठेवा. दररोज झोपण्यापूर्वी एक चमचा हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घ्या.

ब्लोटिंग पासून बचाव

ओव्याचा वापर केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर पचनाच्या समस्या दूर करण्यासाठीही केला जातो. बर्‍याच वेळा लोकांना खाल्ल्यानंतर पोट फुगण्याची म्हणजेच ब्लोटिंगची समस्या असते. अशा वेळी ओवा पाचक एन्झाईम्स वाढवून अन्न जलद पचण्यास मदत करते. त्याचे अँटी ऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेटरी गुणधर्म पोटातील जळजळ कमी करून फुगणे टाळण्यास मदत करतात.

अॅसिडिटी

अ‍ॅसिडिटी आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठीही ओवा खूप उपयुक्त आहे. ओव्यामध्ये असलेले थायमॉल, सक्रिय एन्झाइम, गॅस्ट्रिक ज्यूस स्राव करण्यास मदत करते, ज्यामुळे पचन सुधारते. पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ओवा पाण्यासोबत घ्या.

सर्दी आणि फ्लूमध्ये फायदेशीर

ओवा खोकला तसेच थुंकीच्या समस्येमध्ये आराम देण्याचे काम करू शकते. हे ब्रोन्कियल नलिका रुंद करण्यास मदत करून दम्याच्या रुग्णांना देखील मदत करू शकते. त्याचे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म एखाद्या व्यक्तीला हंगामी इंफेक्शनपासून वाचवण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या