मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या या नीतीचा अवलंब केल्याने मिळते यश!

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या या नीतीचा अवलंब केल्याने मिळते यश!

Jun 03, 2023, 10:05 AM IST

    • Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्र या ग्रंथात जीवनातील विविध पैलूंचे वर्णन केले आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्या या नीतीचा अवलंब करावा.
चाणक्य नीती

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्र या ग्रंथात जीवनातील विविध पैलूंचे वर्णन केले आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्या या नीतीचा अवलंब करावा.

    • Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या निती शास्त्र या ग्रंथात जीवनातील विविध पैलूंचे वर्णन केले आहे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर त्यांच्या या नीतीचा अवलंब करावा.

Chanakya Niti For Success: आचार्य चाणक्य हे एक महान शिक्षणतज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि अर्थशास्त्रज्ञ मानले जातात. आचार्यांनी त्यांच्या निती शास्त्र या ग्रंथात करिअर सुख-दुःख, रोग, प्रगती, यश-अपयश, नोकरी, परिवार, आरोग्या अशा जीवनाच्या प्रत्येक पैलूशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांची धोरणे आजही प्रासंगिक आहेत. असे म्हणतात की ज्यांनी आचार्य चाणक्यांची धोरणे स्वीकारली त्यांना जीवनात क्वचितच अपयशाला सामोरे जावे लागते. जाणून घ्या आजची चाणक्य नीती-

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

कस्य दोषः कुलेनास्ति व्याधिना को न पीडितः।

व्यसनं केन न प्राप्तं कस्य सौख्यं निरन्तरम्।।

जगात असे कोणतेही घराणे किंवा कुळ किंवा वंश नाही, ज्यामध्ये कोणताही दोष किंवा अवगुण नाही. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो. असा कोण आहे जो व्यसनात गुंतत नाही आणि असा कोण आहे जो नेहमी आनंदी राहतो, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात.

आचार्य चाणक्य यांनी अगदी बरोबरच म्हटले आहे की, दुर्मिळ असा एखादा वंश किंवा कुळ असावा ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसावा. त्याच प्रमाणे, सर्व लोक कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतात. ज्या व्यक्तीला काही वाईट व्यसन लागते किंवा ज्याला वाईट गोष्टी करण्याची सवय लागते, त्यालाही त्रास सहन करावा लागतो. जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही, ज्याला नेहमीच आनंद मिळत असेल आणि कधीही संकटांनी घेरले नसेल. म्हणजे कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. प्रत्येकाला एक प्रकारे दु:ख जाणवत असते. त्यामुळे जर आज अपयश आले किंवा दुःख आले तर त्याने खचून जाऊ नये. आलेली परिस्थिती बदलणार आहे हे लक्षात ठेवल्यास जीवनात नक्की यशस्वी व्हाल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या