मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  दसऱ्याला राम-सीतेच्या नात्यातून घ्या हे ५ धडे, नात्यात राहील प्रेम आणि आदर

दसऱ्याला राम-सीतेच्या नात्यातून घ्या हे ५ धडे, नात्यात राहील प्रेम आणि आदर

Oct 05, 2022, 10:48 AM IST

    • Dasara 2022 : आज देशभरात विजयादशमीचा सण साजरा केला जात आहे. आज या खास प्रसंगी आपण प्रभू श्री राम आणि माता सीता यांच्या नात्याशी संबंधित असे ५ धडे जाणून घेऊया, जे प्रत्येक विवाहित जोडप्याने सुखी जीवन जगण्यासाठी त्यांच्या आयुष्यात घेतले पाहिजेत.
दसऱ्यानिमित्त राम-सीतेच्या नात्यातून घ्या हे धडे

Dasara 2022 : आज देशभरात विजयादशमीचा सण साजरा केला जात आहे. आज या खास प्रसंगी आपण प्रभू श्री राम आणि माता सीता यांच्या नात्याशी संबंधित असे ५ धडे जाणून घेऊया, जे प्रत्येक विवाहित जोडप्याने सुखी जीवन जगण्यासाठी त्यांच्या आयुष्यात घेतले पाहिजेत.

    • Dasara 2022 : आज देशभरात विजयादशमीचा सण साजरा केला जात आहे. आज या खास प्रसंगी आपण प्रभू श्री राम आणि माता सीता यांच्या नात्याशी संबंधित असे ५ धडे जाणून घेऊया, जे प्रत्येक विवाहित जोडप्याने सुखी जीवन जगण्यासाठी त्यांच्या आयुष्यात घेतले पाहिजेत.

Relationship Lessons From Ram and Sita : जेव्हा जेव्हा आदर्श पती-पत्नीच्या उदाहरणाचा विचार केला जातो, तेव्हा लोक अजूनही भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान श्री राम आणि माता सीता यांचे नाव घेतात. राजा असूनही, भगवान श्रीरामांना एकच पत्नी आणि राणी होती, तिचे नाव सीता होते. त्याच बरोबर माता सीतेबद्दल बोलायचे झाले तर तिची पवित्रता, तिची आदर्श पत्नी असण्याची अनेक उदाहरणे राम चरित मानसमध्येही पाहायला मिळतात. प्रभू राम आणि माता सीता यांनी त्यांच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना केला असेल परंतु त्यांचा त्यांच्या प्रेम आणि विश्वासावर कधीही परिणाम झाला नाही. आज देशभरात विजयादशमीचा सण साजरा केला जात आहे. आज या खास प्रसंगी आपण प्रभू श्री राम आणि माता सीता यांच्या नात्याशी संबंधित असे ५ धडे जाणून घेऊया, जे प्रत्येक विवाहित जोडप्याने सुखी जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनात अंमलात आणले पाहिजेत.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

कठीण काळातही एकमेकांना साथ द्या

माता सीता राजकुमारी होती. असे असूनही, तिने पती श्री रामच्या वनवासात जाण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आणि स्वत: पती श्री राम सोबत १४ वर्षे जंगलात राहण्यास तयार झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी एकमेकांवर विश्वास ठेवला.

पैसा नाही तर पुण्य पहा

मोठमोठे राजे, महाराज माता सीतेच्या स्वयंवराला हजर होते, पण सीता मातेचा विवाह श्री राम यांच्याशी झाला होता, जो आपल्या गुरूंसोबत तिथे पोहोचला होता. तोपर्यंत श्रीराम अयोध्येचे राजाही झाले नव्हते. इतकेच नाही तर राम वनवासात असताना माता सीतेनेही राजवाड्यातील सर्व सुखसोयी नाकारल्या आणि पती श्री राम यांच्यासह वनवासात जाऊन त्यांची सेवा करणे योग्य मानले. वाईट काळातही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.

भांडणाचा मुलांवर वाईट परिणाम होऊ देऊ नका

आजकाल कपल्स एकमेकांशी भांडण करताच एकमेकांचे वाईट करू लागतात. पण जेव्हा माता सीता लव आणि कुशसह भगवान श्री रामापासून विभक्त राहू लागली तेव्हा तिने भगवान रामाबद्दल कधीही वाईट विचार आपल्या मनात येऊ दिला नाही. तिने नेहमी इतर लोकांकडून पती रामची प्रशंसा केली. याच कारणामुळे लव आणि कुश देखील त्यांच्या वडिलांकडे नेहमी आदराने पाहत असत.

पतिव्रता

रावणाने पळवून नेल्यानंतरही माता सीतेने आपले पावित्र्य राखले. त्यांनी आपल्या सद्गुणी धर्माचे पालन केले आणि आपल्या सन्मानाला धक्का लागू दिला नाही. तिने शेवटपर्यंत रावणाला नमन केले नाही. त्याचवेळी भगवान रामाने राजा असल्याने दुसऱ्या लग्नाचा विचारही केला नव्हता. एकमेकांपासून दूर असूनही दोघांमध्ये एकमेकांवरील प्रेम आणि लग्नाचा धर्म सारखाच राहिला.

आदर

माता सीतेच्या अपहरणानंतर, श्रीरामांनी तिला वाचवण्यासाठी आणि तिच्या सुरक्षेसाठी लंकापती रावणाशी युद्ध करण्याचे मान्य केले. प्रत्येक पतीने आपल्या पत्नीच्या सुरक्षिततेची आणि सन्मानाची काळजी घेतली पाहिजे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

पुढील बातम्या