मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Diet Tips: ब्रेकफास्टमध्ये चुकूनही खाऊ नका या गोष्टी, वाढू शकतो लठ्ठपणा

Diet Tips: ब्रेकफास्टमध्ये चुकूनही खाऊ नका या गोष्टी, वाढू शकतो लठ्ठपणा

Jan 16, 2023, 11:03 AM IST

    • How to Reduce Belly Fat: आहारावर नियंत्रण ठेवल्याने वजन कमी होते. पण अनेक वेळा लोक काही अनहेल्दी गोष्टींना हेल्दी मानतात आणि त्यांचा नाश्त्यात समावेश करतात. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. ब्रेकफास्ट मध्ये या काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.
ब्रेकफास्ट मध्ये या गोष्टी खाणे टाळावे

How to Reduce Belly Fat: आहारावर नियंत्रण ठेवल्याने वजन कमी होते. पण अनेक वेळा लोक काही अनहेल्दी गोष्टींना हेल्दी मानतात आणि त्यांचा नाश्त्यात समावेश करतात. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. ब्रेकफास्ट मध्ये या काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.

    • How to Reduce Belly Fat: आहारावर नियंत्रण ठेवल्याने वजन कमी होते. पण अनेक वेळा लोक काही अनहेल्दी गोष्टींना हेल्दी मानतात आणि त्यांचा नाश्त्यात समावेश करतात. ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. ब्रेकफास्ट मध्ये या काही गोष्टी खाणे टाळले पाहिजे.

Avoid these Foods in Breakfast: सकाळचे पहिले मील अर्थात ब्रेकफास्ट हेल्दी घेण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. जर तुम्ही नाश्ता स्किप केला तर तुम्हाला दिवसभर मिळणारी ऊर्जा कमी होते. जे लोक सकाळी ६ वाजता उठतात त्यांनी ८ किंवा १० वाजता नाश्ता केला पाहिजे. हे तुम्हाला दिवसभर सक्रिय ठेवण्यास मदत करते. त्याच वेळी भूकेवर सुद्धा नियंत्रण राहते आणि आपण काहीही चुकीचे खाण्यापासून वाचतो. अनेक घरांमध्ये सकाळचा नाश्ता हेवी तर असतो पण तरी त्यात पोषणाचे प्रमाण खूपच कमी असते. जर तुम्हाला हेवी आणि पौष्टिक नाश्ता खायचा असेल तर या यादीत समाविष्ट असलेल्या गोष्टी खाणे किंवा पिणे टाळा.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

व्हाईट ब्रेड

ब्रेड हा नाश्त्यात खाल्ला जाणारा अतिशय सामान्य पदार्थ आहे. ते झटपट तयार होत असल्याने लोक सहसा ते खातात. पण व्हाईट ब्रेड खाल्ल्याने वजन खूप वेगाने वाढते, विशेषत: पोट आणि कंबरे भोवती. व्हाईट ब्रेडमध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट असते, ज्यामुळे शरीरातील चरबी वाढते.

ब्रेकफास्ट सीरियल्स

सकाळच्या नाश्त्यात खाण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे ब्रेकफास्ट सीरियल उपलब्ध आहेत. ते खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की त्यात साखरेचे प्रमाण कमी असावे आणि फायबर, प्रोटीन असावे.

स्मूदी

स्मूदी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, पण जेव्हा नाश्त्याचा प्रश्न येतो तेव्हा स्मूदीपासून दूर राहा. फळांपासून तयार केलेल्या स्मूदीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे सकाळी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. म्हणूनच संध्याकाळी स्मूदीज घेण्याचा सल्ला दिला जातो.

कॉफी

सकाळी फ्रेश होण्यासाठी लोक अनेकदा कॉफी किंवा चहा पितात. जर तुम्ही सकाळी साखर आणि साय मिश्रित कॉफी प्यायली तर लगेच सोडा. त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. जर तुम्हाला कॉफी प्यायची असेल तर ब्लॅक कॉफी प्या.

पॅकेज केलेले ज्यूस

सकाळी फळे आणि फळांचे ज्यूस पिणे चांगले असते. पण बाजारात उपलब्ध असलेले पॅकेज केलेले ज्यूस पिणे टाळा. त्यात स्वीटनर मिसळले जाते. ज्यामुळे लठ्ठपणा येतो. मधुमेह आणि आरोग्याच्या अनेक समस्या वाढवतात. नाश्त्यात नेहमी ताज्या फळांचा रस प्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या