मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Christmas Costume: ख्रिसमसला मुलांना सांताक्लॉज बनवता लक्षात ठेवा या गोष्टी

Christmas Costume: ख्रिसमसला मुलांना सांताक्लॉज बनवता लक्षात ठेवा या गोष्टी

Dec 01, 2022, 08:21 PM IST

    • ख्रिसमसला सांताचा ड्रेस घातलेले छोटे छोटे मुले खूप गोंडस दिसतात. तुम्हीही या वर्षी तुमच्या मुलाला सांता क्लॉज बनवण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरू नका.
मुलांना सांता क्लॉज बनवण्यासाठी टिप्स

ख्रिसमसला सांताचा ड्रेस घातलेले छोटे छोटे मुले खूप गोंडस दिसतात. तुम्हीही या वर्षी तुमच्या मुलाला सांता क्लॉज बनवण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरू नका.

    • ख्रिसमसला सांताचा ड्रेस घातलेले छोटे छोटे मुले खूप गोंडस दिसतात. तुम्हीही या वर्षी तुमच्या मुलाला सांता क्लॉज बनवण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरू नका.

Christmas Costume Ideas for Kids: लहान मुलांचा आवडता सण ख्रिसमस लवकरच येत आहे. आनंदाचा हा सण, ख्रिसमस दरवर्षी २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. या खास दिवशी मुलांना चॉकलेट, केक आणि भेटवस्तू दिल्या जातात. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, लोक स्वत: सीक्रेट सांता बनतात आणि मुलांना व मोठ्यांना गिफ्ट देतात. लहान मुलेही सिक्रेट सांताची आतुरतेने वाट पाहत असतात, जेणेकरून त्यांनाही सांताकडून भेटवस्तू मिळतील. इतकंच नाही तर लहान मुलं या दिवशी सांताचा ड्रेस परिधान करून खूप गोंडस दिसतात. तुम्हीही या वर्षी तुमच्या मुलाला सांता क्लॉज बनवण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरू नका.

ट्रेंडिंग न्यूज

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

National Endangered Species Day 2024: राष्ट्रीय लुप्तप्राय प्रजाती दिन साजरा करण्याचा इतिहास काय आहे? जाणून घ्या या दिवस

World Hypertension Day 2024: का साजरा केला जातो वर्ल्ड हायपरटेन्शन डे? जाणून घ्या इतिहास आणि यावर्षीची थीम

कपडे

या ख्रिसमसमध्ये जर तुम्हीही तुमच्या मुलाला सांता बनवण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी बाजारातून मुलाच्या साइजचे सांता क्लॉजचे कपडे खरेदी करा. अनेक वेळा पालक पैसे वाचवण्यासाठी मुलासाठी आकाराचा मोठा ड्रेस विकत घेतात जेणेकरून तो पुढच्या वर्षीही तो घालू शकेल. हे अजिबात करू नका. मुलासाठी नेहमी त्याच्या साइजचा ड्रेस खरेदी करा, अन्यथा ते मूल चांगले दिसत नाही.

थंडीची काळजी घ्या

ख्रिसमसच्या वेळी थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे मूल आजारीही पडू शकते. अशा परिस्थितीत, मुलाला सांता क्लॉजचे कपडे घालण्यापूर्वी, आत उबदार कपडे घालण्याची खात्री करा. पण हे करत असताना सांता क्लॉजच्या ड्रेसने मुलाचे इनर आणि आतील कपडे चांगले झाकलेले आहेत हे लक्षात ठेवा.

टोपी विसरू नका

मुलाला सांता लुक देण्यासाठी सांताची पॉम पॉमवाली कॅप घाला. यासोबतच इतर मुलांसाठी भेटवस्तू असलेली लाल रंगाची छोटी पिशवीही खांद्यावर लटकवावी.

बेल्ट देखील महत्वाचे आहे

जर तुम्हाला मूल पूर्णपणे रियल दिसावे असे वाटत असेल तर त्याला मोठा काळा पट्टा आणि काळे चमकदार बूट घालायला विसरू नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यासोबत पांढऱ्या रंगाचे हातमोजेही घालू शकता.

दाढीचा वापर

आजकाल सांताच्या पांढऱ्या रंगाची दाढी बाजारात वेगळी उपलब्ध आहे, जी तुम्ही मुलांच्या चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी तुम्हाला ते चिकटवण्याची गरज नाही कारण त्यावर रबर असते. तसेच पांढऱ्या दाढीसोबतच मुलाला पांढऱ्या रंगाचे केस आणि चष्मा देखील लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या