मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Spondylosis : खासदार नवनीत राणांना आहे हा दुर्मिळ आजार, वाचा धोका आणि लक्षणं…

Spondylosis : खासदार नवनीत राणांना आहे हा दुर्मिळ आजार, वाचा धोका आणि लक्षणं…

May 05, 2022, 10:40 AM IST

    • अमरावतीच्या फायरब्रँड खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डिलायसिस नावाचा दुर्मिळ आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं आता या आजाराची चर्चा होत आहे.
Independent MP from Amravati Navneet Rana (HT_PRINT)

अमरावतीच्या फायरब्रँड खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डिलायसिस नावाचा दुर्मिळ आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं आता या आजाराची चर्चा होत आहे.

    • अमरावतीच्या फायरब्रँड खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डिलायसिस नावाचा दुर्मिळ आजाराची लागण झाली आहे. त्यामुळं आता या आजाराची चर्चा होत आहे.

Spondylosis Symptoms And Treatment : अमरावतीच्या फायरब्रँड अपक्ष खासदार नवनीत राणा या गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारसोबत संघर्षामुळं चर्चेत आल्या आहेत. नवनीत राणा या त्यांच्या पर्सनालिटी आणि वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असतात. परंतु तुम्हाला माहितीये का राणा या स्पॉन्डिलायसिस नावाच्या दुर्मिळ आजारानं त्रस्त आहेत. या आजाराला गाउट रोग असंही म्हटलं जातं. या आजाराची लागण झाल्यामुळं कंबरदुखी आणि पाठदुखीचा त्रास होत असतो.

ट्रेंडिंग न्यूज

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

खासदार नवनीत राणा यांना असलेल्या स्पॉन्डिलायसिस या आजारामुळं व्यक्तीला फार वेदना होत असतात. त्यासाठी शस्त्रक्रियाही करण्याची गरज असते. दरवर्षी भारतात या आजाराच्या १० लाख केसेस आढळतात. त्यामुळं आता या आजाराची काय लक्षणं आहेत आणि हा रोग का होतो, याबाबत जाणून घेऊयात.

स्पॉन्डिलायसिस या आजाराची लागण झाल्यानंतर त्यामुळं कंबरदुखीचा फार मोठा त्रास जाणवायला लागत असतो. हा रोग व्यक्तीला वयाच्या १६ व्या वर्षापासून होण्याची शक्यता असते. या आजाराचा परिणाम हा यकृतावर आणि ह्रदयावर होत असतो.

कोणती चाचणी करायला हवी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार या आजाराची ओळख करण्यासाठी HLA-B27 ही चाचणी केली जाते. हा एक प्रकारचा जनूक आहे ज्याला रक्ततपासणीद्वारे शोधलं जातं. त्यानंतर रक्ततपासणीनंतर एमआरआयमध्ये स्पॉन्डिलोसिसचा खुलासा होतो.

स्पॉन्डिलोसिसचा उपचार काय आहे?

हा आजार असलेल्या लोकांना कोणत्याही विशेष उपचाराची व्यवस्था सध्या नाही. त्यामुळं हा आजार असलेल्या लोकांना औषधांच्या सहाय्यानं जगावं लागतं. त्यासाठी स्नायू शिथिल करणारे आणि स्टिरॉइड इंजेक्शन्सचीही मदत घेणं फायदेशीर ठरतं. यासोबतच काही रुग्ण हे फिजिओथेरपीचाही आधार घेतात. या प्रकरणामध्ये रुग्णाला गंभीर शस्त्रक्रिया करावी लागते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या