मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  हेअर ग्रोथसाठी वापरा लाकडी कंगवा, होतील आश्चर्यकारक फायदे

हेअर ग्रोथसाठी वापरा लाकडी कंगवा, होतील आश्चर्यकारक फायदे

May 03, 2022, 12:00 PM IST

    • केस गळण्याचा त्रास प्रत्येक मुलीला आहे. बदलेली जीवनशैली, प्रदुषण, केमिकल युक्त प्रोडक्ट असे काही कारणे असले तरी प्लास्टीकचा कंगवा हे सुद्धा केस तुटण्याचे कारण आहे. हेअर ग्रोथसाठी प्लास्टिक ऐवजी लाकडी कंगवा वापरा. लाकडी कंगवा वापरण्याचे काय काय फायदे आहेत, जाणून घ्या.
हेअर ग्रोथसाठी वापरा लाकडी कंगवा

केस गळण्याचा त्रास प्रत्येक मुलीला आहे. बदलेली जीवनशैली, प्रदुषण, केमिकल युक्त प्रोडक्ट असे काही कारणे असले तरी प्लास्टीकचा कंगवा हे सुद्धा केस तुटण्याचे कारण आहे. हेअर ग्रोथसाठी प्लास्टिक ऐवजी लाकडी कंगवा वापरा. लाकडी कंगवा वापरण्याचे काय काय फायदे आहेत, जाणून घ्या.

    • केस गळण्याचा त्रास प्रत्येक मुलीला आहे. बदलेली जीवनशैली, प्रदुषण, केमिकल युक्त प्रोडक्ट असे काही कारणे असले तरी प्लास्टीकचा कंगवा हे सुद्धा केस तुटण्याचे कारण आहे. हेअर ग्रोथसाठी प्लास्टिक ऐवजी लाकडी कंगवा वापरा. लाकडी कंगवा वापरण्याचे काय काय फायदे आहेत, जाणून घ्या.

तुम्ही सुद्धा केस गळतीमुळे त्रस्त आहात? ते तुमच्या प्लास्टिकच्या कंगव्यामुळे तर होत नाही ना? जर तुम्हाला तुमचे केस नेहमीसारखे निरोगी आणि चमकदार हवे असतील तर प्लास्टिकचा कंगवा सोडा आणि लाकडी कंगवा वापरणे सुरू करा. केसांच्या चांगल्या वाढीसाठी प्लॅस्टिकऐवजी लाकडी कंगवा का वापरावा हे जाणून घ्यायचे असेल तर नक्की वाचा.

ट्रेंडिंग न्यूज

Gallbladder Stone: पित्ताशयातील खडे आणि त्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या तज्ज्ञांकडून

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे होऊ शकते पाठदुखी, जाणून घ्या कसे करावे उपचार

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

नैसर्गिक चमकः लाकडी कंगवा केसांचा गुंता सोडवतो आणि त्यांना नैसर्गिक चमक देतो. नैसर्गिक सामग्रीपासून बनविलेले, लाकडी कंगवामुळे ऍलर्जी किंवा त्वचेच्या कोणत्याही समस्या उद्भवण्याची शक्यता नाही. तर प्लास्टिकच्या कंगव्याचे हे तोटे आहेत.

स्काल्प ऑइल केसांना चांगल्या प्रकारे पोहचवतेः लाकडी कंगवा स्काल्पचे नैसर्गिक तेल संपूर्ण केसांमध्ये सहजपणे वितरीत करू शकते. प्लॅस्टिकच्या कंगव्यामध्ये आधीच घाण साचलेली असते, ज्यामुळे केसांमध्ये इन्फेक्शन होऊ शकते.

उत्तम ब्लड सर्कुलेशनः कार्बन बेस्ड असल्याने लाकडी कंगवा त्वचेला स्क्रॅच किंवा इजा न करता स्काल्पची मालिश करतो. त्यामुळे डोक्यातील ब्लड सर्कुलेशन चांगले राहून मन शांत राहते.

केसांची वाढः प्लास्टिकच्या कंगव्यापेक्षा लाकडी कंगव्याचा वापर जास्त केल्याने केसांची वाढ चांगली झाल्याचे दिसून येते. त्यामुळे केसांच्या मुळांना मसाज होते आणि त्यामुळे केस दाट आणि मजबूत होतात. तर प्लॅस्टिकच्या कंगव्यामुळे स्ट्रोकच्या शेवटी गुंता तयार होऊन ते तूटतात.

कोंडा कमी होतोः स्काल्पच्या कोरडेपणामुळे डोक्यावर खाज सुटणे आणि कोंड्याची समस्या उद्भवते. डोक्यातील कोंडा फक्त केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवण्यापासून रोखत नाही तर त्यांना कमकुवत देखील बनवतो. पण लाकडी कंगव्याचे मऊ, गोलाकार दात स्काल्पला आराम देतात आणि केसांमध्ये घाण जमा होण्यापासून रोखतात. त्यामुळे कोंडा होण्याची शक्यता कमी होते. दुसरीकडे, प्लास्टिकचा कंगवा वापरताना, प्लास्टिक चार्जमुळे घाण देखील केसांना चिकटते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पुढील बातम्या