मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  आरोग्यासाठी फायदेशीर आहे लेमनग्रास टी, ट्राय केला का?

आरोग्यासाठी फायदेशीर आहे लेमनग्रास टी, ट्राय केला का?

Aug 11, 2022, 11:10 AM IST

    • चहाचे कितीतरी प्रकार तुम्हाला माहित असतील. पण तुम्ही कधी लेमनग्रास टी घेतला आहे का?
लेमनग्रास टीचे फायदे

चहाचे कितीतरी प्रकार तुम्हाला माहित असतील. पण तुम्ही कधी लेमनग्रास टी घेतला आहे का?

    • चहाचे कितीतरी प्रकार तुम्हाला माहित असतील. पण तुम्ही कधी लेमनग्रास टी घेतला आहे का?

ग्रीन टी, ब्लॅक टी हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे तर तुम्ही ऐकले असेलच. असेच लेमनग्रास टी सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लेमनग्रास टी म्हणजेच गवती चहा. शतकानुशतके औषधी वनस्पती आणि हर्बल टी वापरल्या जात आहेत. लेमनग्रास चहा पचन, तणाव, चिंता, संक्रमण, वेदना, हृदयरोग आणि इतर अनेक आजारांवर मदत करू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

हे आहेत लेमनग्रास टीचे (Benefits of Lemongrass Tea)

पचनासाठी उत्तम - लेमनग्रास पचनासाठी खूप चांगले आहे, जे तुमचे पोट शांत करण्यास मदत करते आणि तुमचे पचन नियंत्रित ठेवते. यामध्ये सायट्रल नावाचे तत्व असते जे अन्न पचण्यास मदत करते.

भरपूर अँटिऑक्सिडंट्स - लेमनग्रास टी हा एक प्रकारचा डिटॉक्स चहा आहे. त्यात अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला आतून डिटॉक्सिफाय आणि साफ करण्यास मदत करतात. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

वजन कमी करण्यास करते मदत - लेमनग्रास टी चा वापर डिटॉक्स टीच्या रुपाने मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी केला जातो. तो वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

हेअर ग्रोथ होते बूस्ट - केसांच्या वाढीसाठी लेमनग्रास ही एक प्रभावी पद्धत आहे, जी केसांचे पोर्स उघडण्यास आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि सी असतात, जे त्वचा आणि केस दोघांसाठी आवश्यक पोषक घटक म्हणून काम करतात.

ओरल हेल्थ करते बूस्ट - अभ्यासानुसार लेमनग्रासमधील अँटीमायक्रोबियल गुण स्ट्रेप्टोकोकस सॅन्गुनिस बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करतात, हे बॅक्टेरिया दात किडण्यासाठी जबाबदार असतात. लेमनग्रासमुळे तुमची ओरल हेल्थ म्हणजे तोंडाचे आरोग्य देखील सुधारते.

उच्च रक्तदाब करते नियंत्रित - लेमनग्रासमध्ये पोटॅशियम असते, त्यामुळे यूरिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे ते रक्तदाब कमी करते आणि रक्त प्रवाह वाढवते.

 

कसा बनवायचा लेमनग्रास टी?

लेमनग्रास टी बनवण्यासाठी ४ कप पाणी, १ कप लेमनग्रास, १ टेबलस्पून मध घ्या. लेमनग्रास पाण्याने धुवा आणि नंतर साफ केल्यानंतर त्यांचे लहान तुकडे करा आणि ग्राइंडिंग स्टोनच्या मदतीने बारीक करा. गॅसवर पॅन ठेवा, त्यात पाणी घाला आणि उकळू द्या. पाण्यात लेमनग्रासचे छोटे तुकडे घाला आणि १० मिनिटे उकळू द्या. शेवटी त्यात मध टाकून प्या.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या