मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित जाणून घेऊयात ५ इंटरेस्टिंग गोष्टी!

Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनी भारताच्या स्वातंत्र्याशी संबंधित जाणून घेऊयात ५ इंटरेस्टिंग गोष्टी!

Aug 15, 2023, 12:20 PM IST

    • Interesting facts about 15 august: आज आम्‍ही तुम्‍हाला स्‍वातंत्र्य दिनाच्‍या काही रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
Independence day 2023 (Freepik )

Interesting facts about 15 august: आज आम्‍ही तुम्‍हाला स्‍वातंत्र्य दिनाच्‍या काही रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

    • Interesting facts about 15 august: आज आम्‍ही तुम्‍हाला स्‍वातंत्र्य दिनाच्‍या काही रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Independence Day 2023: १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले, त्यामुळे हा दिवस खूप खास आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या जल्लोषात उत्साहात रंगला आहे. यावेळी स्वातंत्र्यदिनाची थीम नेशन फर्स्ट ऑल्वेज फर्स्ट अशी आहे. आत्तापर्यंत तुम्ही देश कधी स्वतंत्र झाला, कोणी स्वातंत्र्य दिले याच्याशी संबंधित अनेक कथा ऐकल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला या सगळ्यांव्यतिरिक्त काही रंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

स्वातंत्र्याशी संबंधित इंटरेस्टिंग गोष्टी

> पहिली रंजक गोष्ट म्हणजे पहिल्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत नव्हते. रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ मध्ये बंगाली भाषेत जन गण मन हे राष्ट्रगीत लिहिले असले तरी त्याला राष्ट्रगीताचा दर्जा १९५० मध्ये मिळाला.

> पहिल्या स्वातंत्र्यदिनी १५ ऐवजी १६ ऑगस्ट रोजी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले होते.

Interesting Facts About Indian Flag: तिरंगा कोणी बनवला? त्याच्या रंगांचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?

> १५ ऑगस्टशी संबंधित सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे भारताव्यतिरिक्त, दक्षिण कोरिया, बहरीन आणि काँगो देखील या दिवशी त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा करतात. १५ ऑगस्ट १९४५ रोजी दक्षिण कोरिया जपानपासून, १५ ऑगस्ट १९७१ रोजी बहरीन ब्रिटनपासून आणि १५ ऑगस्ट १९६० रोजी काँगो फ्रान्सपासून मुक्त झाला.

> त्याचवेळी १५ ऑगस्टलाच वीर चक्राला मान्यता मिळाली. याशिवाय, १५ ऑगस्ट १९७२ रोजी भारतात ६ अंकी क्रमांक असलेली पोस्टल पिन सुरू झाली. याशिवाय १५ ऑगस्ट १९८२ रोजी इंदिरा गांधींच्या भाषणाने भारतात टीव्हीवर रंगीत प्रसारण सुरू झाले.

Independence Day 2023: केवळ भारतच नाही तर हे चार देशही १५ ऑगस्टला करतात स्वातंत्र्यदिन साजरा!

> १५ ऑगस्टला भारत-पाकिस्तान (पाकिस्तान-भारत सीमा) सीमारेषा काढली गेली नसून १७ ऑगस्टला ती रॅडक्लिफ लाईन म्हणून काढली गेली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५६० संस्थानांचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)

विभाग

पुढील बातम्या