मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Riteish Deshmukh: भर कार्यक्रमात रितेश देशमुखनं जिनिलियाचे पाय धरले! Video Viral

Riteish Deshmukh: भर कार्यक्रमात रितेश देशमुखनं जिनिलियाचे पाय धरले! Video Viral

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 24, 2023, 05:37 PM IST

  • Genelia Deshmukh: एका पुरस्कार सोहळ्यात जिनिलियाने रितेशची प्रशंसा केली. ती ऐकून रितेश लाजेने लाल झाला आहे. पाहा व्हिडीओ

जिनिलिया डिसूजा

Genelia Deshmukh: एका पुरस्कार सोहळ्यात जिनिलियाने रितेशची प्रशंसा केली. ती ऐकून रितेश लाजेने लाल झाला आहे. पाहा व्हिडीओ

  • Genelia Deshmukh: एका पुरस्कार सोहळ्यात जिनिलियाने रितेशची प्रशंसा केली. ती ऐकून रितेश लाजेने लाल झाला आहे. पाहा व्हिडीओ

बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते आणि लाकडे कपल म्हणून अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुख ओळखले जातात. संपूर्ण महाराष्ट्र जिनिलियाला देशमुख वहिनी म्हणून आवाज देतो. काही दिवसांपूर्वी त्यांचा वेड हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता सध्या सोशल मीडियावर जिनिलियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश जिनिलियाच्या पाया पडताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

नुकताच झी चित्र गौरव हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला रितेश आणि जिनिलियाने हजेरी लावली. त्यांचा याच सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया तिला मिळालेला पुरस्कार हा रितेश देताना दिसते. त्यावेळी जिनिलिया 'अहो...' असे रितेशला बोलताना दिसते. ते ऐकून रितेश लाजेने लाल होतो. पुढे जिनिलिया म्हणते, 'तुम्ही मला श्रावणी दिली, मी तुम्हाला हा पुरस्कार देतेय..' ते ऐकून सर्वजण टाळ्या वाजवतात. नंतर रितेश मंचावर जातो. जिनिलियाच्या हातातला पुरस्कार घेतो आणि तिच्या पाया पडतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: प्राजक्ता माळीचे छोट्या पडद्यावर पुनरागमन! दिसणार 'या' मालिकेत

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात जिनिलियालाल 'वेड' या चित्रपटासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. वेड हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात जिनिलिया आणि रितेश सोबत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी, सिद्धार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तसेच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानहा एका गाण्यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन ४५ दिवस झाले आहेत तरी देखील चित्रपटाची कमाई सुरुच आहे.

पुढील बातम्या