मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhijeet Sawant: पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत सध्या काय करतो? काय आहे कमाईचा स्त्रोत?

Abhijeet Sawant: पहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंत सध्या काय करतो? काय आहे कमाईचा स्त्रोत?

Aarti Vilas Borade HT Marathi

Feb 14, 2024, 02:18 PM IST

    • First Indian Idol Abhijeet Sawant: अभिजीत सावंतने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. त्यांने त्याच्या लाइफस्टाइलविषयी देखील सांगितले आहे.
Abhijeet Sawant

First Indian Idol Abhijeet Sawant: अभिजीत सावंतने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. त्यांने त्याच्या लाइफस्टाइलविषयी देखील सांगितले आहे.

    • First Indian Idol Abhijeet Sawant: अभिजीत सावंतने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला आहे. त्यांने त्याच्या लाइफस्टाइलविषयी देखील सांगितले आहे.

Abhijeet Sawant: छोट्या पडद्यावरील ‘इंडियन आयडॉल’ हा रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. १९ वर्षांपूर्वी या शोचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोचा अभिजीत सावंत हा मराठमोळा स्पर्धक विजेता ठरला होता. अभिजीत सावंत हा राजकीय प्रभावामुळे जिंकला असल्याचा दावा काही दिवसांपूर्वी शोचा उपविजेता ठरलेल्या अमितने केला होता. त्यानंतर अभिजीतने देखील स्पष्टीकरण दिले होते. पण आता अभिजीत सावंत काय करतो? त्याच्या इनकमचा सोर्स काय? असा प्रश्न देखील सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

अभिजीत सावंतने शो जिंकल्यानंतर एक अल्बम केला आणि त्यानंतर काही मोजक्याच चित्रपटांची गाणी गायली. अभिजीत फारसा पुढे येत नसला तरी तो त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी वेगवेगळे शोज करत होता अन् आजही त्याच्या गाण्याच्या माध्यमातून अभिजीत जवळपास ७०% कमाई करतो. अभिजीतने याबाबत स्वत: माहिती दिली आहे.
वाचा: ‘महाठग’ सुकेश चंद्रशेखरमुळे वैतागली जॅकलिन फर्नांडिस! अभिनेत्रीनं उचललं कठोर पाऊल

अभिजीतने नुकताच ‘द म्युझिक पॉडकास्ट’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. खासगी आयुष्य, काम, पैसे कामावण्याचा मार्ग अशा अनेक गोष्टींवर अभिजीतने प्रतिक्रिया दिली. “मी वर्षाला इतके पैसे कमावतो की एक आरामदायी आयुष्य जगू शकेन. स्टेज परफॉर्मन्स, आणि लाईव्ह शोज हे माझ्या कमाईचे मुख्य स्त्रोत आहेत. माझे जुने अल्बम आणि गाणी यातून मिळणारी रॉयल्टीची रक्कम ही फार कमी आहे. सोनी टेलिव्हिजन मात्र मला नेहमी माझा रॉयल्टीचा चेक घेण्यासाठी आठवण करते” असे अभिजीत म्हणाला.

पुढे त्याने लाइव्ह शोचा अनुभव देखील सांगितला आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, “मी सर्वप्रकारचे लाईव्ह शोज करतो. सार्वजनिक शोज ते खासगी कार्यक्रम, कौटुंबिक तसेच कॉर्पोरेट शोज. मला असं वाटतं की एखाद्या कलाकाराला सर्व यायला हवं. स्टेजवर परफॉर्म करत असतानाच मला बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतात. मी माझा सर्वाधिक वेळ हा स्टेजवर घालवतो कारण तो माझा व्यवसाय आहे त्यावर माझं पोटपाणी अवलंबून आहे.”

अभिजीतच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 'मोहोब्बते लुटाऊंगा' हा त्याचा पहिला अल्बम होता. त्यानंतर त्याने लफजोन मे, मर जावा मिट जावा, क्या तुझे पता है, जुनून, याद तेरी याद आणि इतर गाणी गायली. त्यानंतर त्याने सर सुखाची श्रावणी हे मराठी गाणे गायले आहे.

विभाग

पुढील बातम्या