मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Waheeda Rehman : ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

Waheeda Rehman : ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर!

Sep 26, 2023, 01:10 PM IST

  • Waheeda Rehman : अभिनेत्री वहीदा रहमान यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

Waheeda Rehman

Waheeda Rehman : अभिनेत्री वहीदा रहमान यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

  • Waheeda Rehman : अभिनेत्री वहीदा रहमान यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.

Waheeda Rehman : आपल्या दमदार अभिनयाने आणि सुंदर अदाकारीने अवघ्या रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या अभिनेत्री वहीदा रहमान यांना यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. मनोरंजन विश्वातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ची गणना होते. या वर्षी हा सन्मान अभिनेत्री वहीदा रहमान यांना मिळणार आहे. नुकतीच ही महत्त्वपूर्ण घोषण करण्यात आली आहे. वहीदा रहमान यांनी बॉलिवूड विश्वात अनेक दमदार चित्रपट केले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर नुकतीच ५३ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा यांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लग्नाचा करार संपताच सायलीला झालीये अर्जुनवरील प्रेमाची जाणीव! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

‘आरआरआर’ गाजवणाऱ्या ज्युनियर एनटीआरचं खरं नाव माहित आहे का? कसं मिळालं त्याला आजोबांचं नाव? वाचा...

ओठ सुजले अन् चेहराही बिघडला; छोट्या पडद्यावरच्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला पाहून सगळ्यांनाच बसला धक्का!

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. गतवर्षी हा पुरस्कार अभिनेत्री आशा पारेख यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी ‘दादासाहेब फाळके लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ वहीदा रहमान यांना देण्यात येणार आहे. याची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Dev Anand Birth Anniversary: अवघे ३० रुपये घेऊन मुंबईत आले; अभिनेता बनण्याआधी देव आनंद यांनी केलं ‘हे’ काम!

अनुराग ठाकूर यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले की, 'वहिदा रहमानजी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतो आहे. वहिदाजी यांचे हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी समीक्षकांनी कौतुक केले आहे. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहेब बीवी और गुलाम’, ‘गाइड’, ‘खामोशी’ आणि इतर अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. ५ दशकांहून मोठ्या कारकिर्दीत त्यांनी सगळीच पात्रे अतिशय सुंदरपणे साकारली आहेत.’

अनुराग ठाकूर यांनी पुढे लिहिले की, 'त्यांना ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटातील सुंदर भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित वहीदाजी यांनी भारतीय स्त्रीचे समर्पण, सामर्थ्य आणि वचनबद्धतेच्या उत्तम उदाहरण आहेत. एकीकडे संसदेत नारीशक्ती वंदन अधिनियम मंजूर होत असताना, त्यांना या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्याऱ्यास्त्रीचा सन्मान आहे.’

पुढील बातम्या