मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: पुन्हा एकदा दिसले रितेश-जिनिलीयाचे संस्कार; नेटकऱ्यांनी केलं रियान-राहीलचं कौतुक! पाहा व्हिडीओ

Viral Video: पुन्हा एकदा दिसले रितेश-जिनिलीयाचे संस्कार; नेटकऱ्यांनी केलं रियान-राहीलचं कौतुक! पाहा व्हिडीओ

Feb 28, 2023, 05:46 PM IST

  • Viral Video: रितेश आणि जिनिलीयाने दोन्ही मुलांना जे संस्कार दिले आहेत, ज्याप्रकारची मूल्ये रुजवली आहेत त्याचे सर्वजण कौतुक करतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे...

Riteish And Genelia with Sons

Viral Video: रितेश आणि जिनिलीयाने दोन्ही मुलांना जे संस्कार दिले आहेत, ज्याप्रकारची मूल्ये रुजवली आहेत त्याचे सर्वजण कौतुक करतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे...

  • Viral Video: रितेश आणि जिनिलीयाने दोन्ही मुलांना जे संस्कार दिले आहेत, ज्याप्रकारची मूल्ये रुजवली आहेत त्याचे सर्वजण कौतुक करतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे...

Viral Video: बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया डिसूझा हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि परफेक्ट कपल मानले जाते. केवळ रितेश आणि जिनिलीयाच नाही तर, त्यांच्या दोन्ही मुलांचे देखील नेहमीच कौतुक होते. रियान आणि राहील नेहमीच मीडिया कर्मचाऱ्यांना पाहून त्यांच्याशी अतिशय आदरपूर्वक वागतात. यामुळे त्यांचे नेहमीच कौतुक होते. आता देखील त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच राहील आणि रियानचे कौतुक करत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

रितेश आणि जिनिलीयाने दोन्ही मुलांना जे संस्कार दिले आहेत, ज्याप्रकारची मूल्ये रुजवली आहेत त्याचे सर्वजण कौतुक करतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आणि जिनिलीया त्यांच्या दोन्ही मुलांसह विमातळावर जाताना दिसत आहेत. यावेळी पापाराझींनी या कुटुंबाचे व्हिडीओ आणि फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तर, रितेश आणि जिनिलीया यांनी मीडियाला फोटो पोज दिल्या. तर, त्यांच्या दोन्ही मुलांनी माध्यम प्रतिनिधींना पाहून त्यांना नमस्कार केला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या आधी देखील राहील आणि रियान यांनी माध्यम प्रतिनिधींना अतिशय आदरपूर्वक नमस्कार केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. या मागचं कारण स्वतः रितेश आणि जिनिलीयाने स्पष्ट केलं होतं. याबद्दल सांगताना रितेश म्हणाला होता की, ‘आम्ही आमच्या मुलांना सांगून ठेवलेलं आहे. तुमचे आईबाबा जे काम करतात त्यासाठी लोक त्यांचे फोटो काढत असतात. तुम्ही आमची मुलं आहात म्हणून ते तुमचे फोटोही काढतात. पण, त्यांनी तुमचे फोटो काढावेत असं कोणतही काम तुम्ही अजून काहीच केलेलं नाही, तरीही ते तुमचे फोटो काढतात. म्हणून तुम्ही त्यांचे हात जोडून आभार मानायला हवेत.’

रितेश आणि जिनिलीया जसे बेस्ट कपल आहेत, तसेच ते खूप चांगले पालक देखील आहेत. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते आपल्या मुलांसोबत तो वेळ घालवतात. कधी मुलांसोबत पूजा करताना, तर कधी मुलांसोबत पार्कमध्ये फिरतानाचे त्यांचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात.

पुढील बातम्या