मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Vicky Kaushal: भर समुद्रात विकी कौशल झाला रोमँटिक; कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाला...

Vicky Kaushal: भर समुद्रात विकी कौशल झाला रोमँटिक; कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाला...

Jul 17, 2023, 09:57 AM IST

  • Vicky Kaushal Katrina Kaif: कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त दोघेही सध्या परदेशी सुट्टीचा आनंद लुटत आहेत. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त विकीने एक खास पोस्ट लिहिली आहे.

Vicky Kaushal Katrina Kaif

Vicky Kaushal Katrina Kaif: कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त दोघेही सध्या परदेशी सुट्टीचा आनंद लुटत आहेत. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त विकीने एक खास पोस्ट लिहिली आहे.

  • Vicky Kaushal Katrina Kaif: कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त दोघेही सध्या परदेशी सुट्टीचा आनंद लुटत आहेत. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त विकीने एक खास पोस्ट लिहिली आहे.

Vicky Kaushal Katrina Kaif: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने रविवारी पती विकी कौशलसोबत आपला ४०वा वाढदिवस साजरा केला. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त दोघेही सध्या परदेशी सुट्टीचा आनंद लुटत आहेत. कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त विकीने एक खास पोस्ट लिहिली आहे. विकीने समुद्रकिनाऱ्यावरील स्वतःचे आणि कतरिनाचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ही जोडी खूपच रोमँटिक झालेली दिसत आहेत. विकीने या फोटोंना सुंदर कॅप्शन देत लिहिलं की, 'मी तुझ्या जादूने मंत्रमुग्ध झालो आहे.. रोजच... वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या प्रेमा.'

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

या फोटोंमध्ये विकी कौशल पत्नी कतरिना कैफसोबत समुद्रकिनाऱ्यावर सुंदर पोझ देताना दिसत आहे आणि मागे समुद्राच्या लाटांची पार्श्वभूमी आहे. विकी कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी २ दिवसांपूर्वी तिच्यासोबत परदेशी रवाना झाला होता. दोघेही हा खास दिवस बाहेरगावी साजरा करणार, हे तेव्हाच चाहत्यांच्या लक्षात आले होते. कतरिना कैफने दोन वर्षांपूर्वी बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली होती. अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर विकी कौशल आणि कतरिनाने डिसेंबर २०२१ मध्ये सात फेरे घेतले.

कतरिना कैफने १६ जुलै रोजी तिचा ४०वा वाढदिवस साजरा केला आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, या सगळ्यात चाहते विकी कौशलच्या पोस्टची वाट पाहत होते. तो आपल्या लाडक्या पत्नीला कशा शुभेच्छा देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कतरिनाच्या वाढदिवसाआधी दोघेही मुंबई विमानतळावर स्पॉट झाले होते. दोघेही सुट्टीसाठी परदेशी निघाले होते. पत्नी कतरिनाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात विकीने कोणतीही कसर सोडली नाही. कतरिनाच्या आयुष्यातील हा खास दिवस साजरा करण्यासाठी दोघेही एका सुंदर ठिकाणी पोहोचले होते.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भूमी पेडणेकर, झोया अख्तर आणि सनी कौशल यांनी पोस्टवर हार्ट इमोजी शेअर केले आहेत. या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले, ‘हॅपी बर्थडे क्वीन कतरिना!’ तर, आणखी एकाने लिहिले की, 'हॅपी बर्थडे सेलिब्रिटी सुपरस्टार. तुझं व्यक्तिमत्व आणि अभिनय कौशल्यं आम्हाला खूप आवडतं.

पुढील बातम्या