मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Katrina Kaif Birthday: कशी झाली होती अभिनेत्री कतरिना कैफच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात? वाचा...

Katrina Kaif Birthday: कशी झाली होती अभिनेत्री कतरिना कैफच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात? वाचा...

Jul 16, 2023 07:26 AM IST

Katrina Kaif Birthday: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आज (१६ जुलै) तिचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे.

Katrina Kaif
Katrina Kaif

Katrina Kaif Birthday: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आज (१६ जुलै) तिचा ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. कतरिना कैफ गेल्या दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. कतरिना कैफचा जन्म १९८३मध्ये हाँगकाँगमधील टर्कोटे कुल येथे झाला. वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी ती आपल्या कुटुंबासह हवाईला गेली होती. त्यानंतर ती लंडनला स्थायिक झाली. कतरिना कैफचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी होते. तर तिची आई सुझान टॉर्क्वे मूळची ब्रिटिश वंशाची आहे. कतरिना लहान असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. यानंतर तिला तिच्या आईनेच वाढवले.

ट्रेंडिंग न्यूज

कतरिना कैफने २००३मध्ये ‘बूम’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कतरिना कैफने पहिल्याच चित्रपटात खूप बोल्ड सीन्स दिले होते. ‘बूम’ चित्रपटाची निर्मिती टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ यांनी केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांनी कतरिनाला एका फॅशन शोमध्ये पाहिले जोते. यानंतर तिला ‘बूम’ या चित्रपटात कास्ट करण्यात आले. मात्र, कतरिनाला खरी ओळख सलमान खानच्या ‘मैने प्यार क्यूं किया’ या चित्रपटातून ओळख मिळाली.

अभिनेते महेश कोठारेंना मातृशोक; वडिलांनंतर ६ महिन्यातच आईनेही घेतला अंतिम श्वास

गेल्या जवळपास दोन दशकांमध्ये कतरिनाने ‘हमको दीवाना कर गये’, ‘नमस्ते लंडन’, ‘अजब प्रेम की गज़ब कहानी’, ‘जब तक है जान’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कतरिना कैफने वयाच्या १४व्या वर्षी हवाई येथील सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. यानंतर, तिला ज्वेलरी ब्रँडसाठी पहिली मॉडेलिंग असाइनमेंट मिळाली. तिने लंडनमध्ये फ्रीलान्स मॉडेलिंग केले. लंडन फॅशन वीकसाठी तिने रॅम्प वॉक देखील केला. यादरम्यान ती तिच्या मैत्रिणीसोबत भारतात येत होती.

कतरिना कैफही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. कतरिनाने पहिल्यांदा सलमान खानला डेट केले होते. कतरिनाने सलमानसोबतच्या नात्याला आपले पहिलेच रिलेशनशिप म्हटले होते. सलमान खाननंतर कतरिना कैफने रणबीर कपूरला डेट केले. दोघे अनेक वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. २०१६मध्ये दोघांचे ब्रेकअप झाला होता. अखेर २०२१मध्ये कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, कतरिना कैफ लवकरच ‘जी ले जरा’ आणि ‘टायगर ३’मध्ये दिसणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग