मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed Arrest: उर्फी जावेदच्या अटकेमागचं सत्य आलं समोर; आता अभिनेत्रीवर कारवाई होणार!

Urfi Javed Arrest: उर्फी जावेदच्या अटकेमागचं सत्य आलं समोर; आता अभिनेत्रीवर कारवाई होणार!

Nov 04, 2023, 09:35 AM IST

  • Urfi Javed Arrest Truth: उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी तिला पकडून घेऊन जाताना दिसल्या होत्या.

Urfi Javed Arrest video truth

Urfi Javed Arrest Truth: उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी तिला पकडून घेऊन जाताना दिसल्या होत्या.

  • Urfi Javed Arrest Truth: उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी तिला पकडून घेऊन जाताना दिसल्या होत्या.

Urfi Javed Arrest Truth: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शुक्रवारी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी तिला पकडून जीपमध्ये घेऊन जाताना दिसल्या होत्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उर्फीने तोकडे आणि विचित्र कपडे घालून अश्लीलता पसरवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे बोलले जात होते. मात्र, तिचा हा व्हिडीओ खोटा असल्याचे समोर आले आहे. खुद्द मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत, हा व्हिडीओ खोटा असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी उर्फीने हा व्हिडीओ बनवला असल्याचे समोर आले आहे. आता तिच्या या बनावट व्हिडीओवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मुंबई पोलिसांनी उर्फी जावेद आणि व्हिडीओमध्ये दिसणार्‍या महिलांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करून लिहिले की, 'स्वस्तात प्रसिद्धीसाठी कुणीही देशाच्या कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही! मुंबई पोलिसांनी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटक केलेल्या महिलेचा व्हायरल झालेला व्हिडीओ खरा नाही. यात पोलिसांचे मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर झाला आहे. दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओमध्ये सहभागी असलेल्या लोकांविरुद्ध कलम १७१, ४१९, ५००, ३४ आयपीसी अंतर्गत ओशिवरा पोलीस स्थानकामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, व्हिडिओतील खोट्या पोलिसांना अटक करण्यात आली आहे. तसेच वाहनही जप्त करण्यात आले आहे.'

या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यात कलम १७१ (लोकसेवकाचा पोशाख परिधान करणे), कलम ४१९ (फसवणूक), कलम ५०० (फौजदारी मानहानी) आणि समान हेतू असलेल्या अनेक लोकांच्या गुन्हेगारी कृत्यांशी संबंधित कलम ३४ यांचा समावेश आहे. उर्फी जावेद या प्रकरणात अडकण्याची मोठी शक्यता आहे. तर, आता उर्फी जावेदवर खऱ्या खुऱ्या अटकेची टांगती तलवार आहे.

विभाग

पुढील बातम्या