Urfi Javed: बॉलिवूडची फॅशनिस्टा उर्फी जावेद तिच्या विचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. उर्फी जावेदचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस उर्फी जावेद हिला अटक करून पोलीस ठाण्यात नेताना दिसत आहेत. हे पाहून लोकांना प्रश्न पडला आहे, हे नेमकं काय प्रकरण आहे? मात्र, हा व्हिडीओ खरा आहे की, प्रँक आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.