मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bamboo Marathi Movie: ‘बांबू’मधल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? मराठी मालिकेतही साकारतेय मुख्य भूमिका!

Bamboo Marathi Movie: ‘बांबू’मधल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का? मराठी मालिकेतही साकारतेय मुख्य भूमिका!

Dec 30, 2022, 09:34 AM IST

    • Bamboo Marathi Movie: ‘बांबू’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पोस्टरवर झळकलेल्या अभिनेत्रीला पाहताच अनेकांना हा चेहरा ओळखीचा वाटला.
Bamboo Marathi Movie

Bamboo Marathi Movie: ‘बांबू’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पोस्टरवर झळकलेल्या अभिनेत्रीला पाहताच अनेकांना हा चेहरा ओळखीचा वाटला.

    • Bamboo Marathi Movie: ‘बांबू’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पोस्टरवर झळकलेल्या अभिनेत्रीला पाहताच अनेकांना हा चेहरा ओळखीचा वाटला.

Bamboo Marathi Movie: मनोरंजन विश्वात सध्या मराठी चित्रपटांचा बोलबाला आहे. अनेक नवे मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यातच ‘बांबू’ नावाचा मराठी चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या पोस्टरवर चित्रपटाची अभिनेत्री झळकली आहे. या अभिनेत्रीला पाहताच अनेकांना हा चेहरा ओळखीचा वाटला. हा चेहरा आहे अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाचं केलं मतदान! म्हणाला ‘आता कॅनडा नाही माझा देश...’

लग्नाचा करार संपताच सायलीला झालीये अर्जुनवरील प्रेमाची जाणीव! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

‘आरआरआर’ गाजवणाऱ्या ज्युनियर एनटीआरचं खरं नाव माहित आहे का? कसं मिळालं त्याला आजोबांचं नाव? वाचा...

ओठ सुजले अन् चेहराही बिघडला; छोट्या पडद्यावरच्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला पाहून सगळ्यांनाच बसला धक्का!

विविध मालिकांमधून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर. सध्या वैष्णवी ‘तू चाल पुढं’ या मालिकेत मयुरी हे पात्र सकारात आहे. अल्पावधितच वैष्णवीने प्रेक्षकांना आपलेसे केले. आता वैष्णवी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच तिची चित्रपटातील झलक सोशल मीडियावर झळकली आहे. सरळ, साधी, सालस असणारी ही 'झुळूक' तरुणांना भावणारी आहे.

चित्रपटातील पदार्पणाबद्दल बोलताना वैष्णवी कल्याणकर म्हणाली की, ‘मोठ्या पडद्यावर मी पहिल्यांदाच झळकणार आहे. त्यामुळे आनंदी, उत्साही, थोडीशी धाकधूक अशा विविध भावना सध्या मी अनुभवतेय. यात मी 'झुळूक'ची व्यक्तिरेखा साकारतेय, जी खूपच सोज्वळ, निरागस आहे. तरुणींना ही व्यक्तिरेखा आपल्या खूप जवळची वाटेल. जणू काही ही आपल्याच घरातली आहे, असे वाटेल. एका मालिकेदरम्यान मी 'बांबू'मधील 'झुळूक'साठी ऑडिशन दिले होते. माझी निवड झाली आणि प्रॉडक्शनकडून मला एकदा सकाळी सात वाजता पुण्याला बोलवले. आमची ही मीटिंग सुमारे पाच तास चालू होती. त्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरु झाली. आता लवकरच 'झुळूक' तुम्हाला भेटायला येणार आहे.’

क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. तर या चित्रपटाचे लेखन अंबर हडप यांनी केले आहे. अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, स्नेहल शिदम, समीर चौघुले यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बांबू' येत्या २६ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पुढील बातम्या