मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Hritik Roshan: अन् हृतिकने मारली एक्स वाइफला मिठी, सर्वजण बसले पाहात

Hritik Roshan: अन् हृतिकने मारली एक्स वाइफला मिठी, सर्वजण बसले पाहात

Aarti Vilas Borade HT Marathi

Jan 15, 2024, 09:08 PM IST

    • Hrithik Roshan and Sussanne Khan Video: हृतिक आणि सुझान खानने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Hrithik Roshan

Hrithik Roshan and Sussanne Khan Video: हृतिक आणि सुझान खानने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    • Hrithik Roshan and Sussanne Khan Video: हृतिक आणि सुझान खानने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन हा त्याचा आगामी चित्रपट 'फायटर'मुळे चर्चेत आहेत. त्याच्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, हृतिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने पूर्वपत्नी सुझान खानला मिठी मारली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सहा अभिनेत्रींसोबत स्वप्नील जोशी करतोय रोमॅन्स, नेमकी काय आहे भानगड जाणून घ्या ?

मल्लिकाजान पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नेटफ्लिक्सने केली 'हिरामंडी २'ची घोषणा

कलावर मोठे संकट अद्वैतची प्रकृती मध्यरात्री बघडली, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?

सलमान खानशी लग्न करायला फार्म हाऊसमध्ये शिरली २४ वर्षांची तरुणी! पुढं काय झालं पाहा!

हृतिक रोशन हा एका कार्यक्रमाला पोहोचला होता. या कार्यक्रमात त्याची पूर्वपत्नी सुझान खानदेखील उपस्थित होती. हृतिक या कार्यक्रमात येताच सुझानने त्याला मिठी मारली आहे. तिचा मिठी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
वाचा: रागात गाडीतून उतरला आणि फोन खेचला; एमसी स्टॅनचा शिव्या देतानाचा व्हिडीओ व्हायरल

एका यूजरने 'हे दोघे एकत्र चांगले दिसतात' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'त्यांची जोडी छान दिसते' असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केले होते. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

विभाग

पुढील बातम्या