मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  National Film Awards 2023: अल्लू अर्जुनला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, लूक पाहून चाहते फिदा

National Film Awards 2023: अल्लू अर्जुनला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, लूक पाहून चाहते फिदा

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 17, 2023, 03:54 PM IST

    • Allu Arjun: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
Allu Arjun

Allu Arjun: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

    • Allu Arjun: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२३ नुकताच पार पडला. ६९वा हा पुरस्कार सोहळा नवी दिल्लीमधील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. आता या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या अभिनेत्याला सर्वोत्कृत्य अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला असा प्रश्न पडला आहे. चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

लग्नाचा करार संपताच सायलीला झालीये अर्जुनवरील प्रेमाची जाणीव! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

‘आरआरआर’ गाजवणाऱ्या ज्युनियर एनटीआरचं खरं नाव माहित आहे का? कसं मिळालं त्याला आजोबांचं नाव? वाचा...

ओठ सुजले अन् चेहराही बिघडला; छोट्या पडद्यावरच्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला पाहून सगळ्यांनाच बसला धक्का!

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेता या कॅटेगिरीमधील पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी त्याने खास लूकमध्ये या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. पुरस्कार मिळताच अल्लू अर्जुनने माध्यमाशी संवाद साधला.
वाचा: पहिल्याच दिवशी 'बिग बॉस १७'च्या घरात झाला जोरदार राडा; स्पर्धकांमध्ये हाणामारी!

अल्लू अर्जुनने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, "मी खूप आनंदी आहे आणि मला दुप्पट आनंद होत आहे कारण हा पुरस्कार एका व्यावसायिक चित्रपटासाठी मिळत आहे." दरम्यान, अल्लूने पांढऱ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला होता. त्यावर काळ्या रंगाचा चष्मा लावला.

अल्लू अर्जुनला 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आज त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

विभाग

पुढील बातम्या