मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dahaad Teaser Out: एक-दोन नव्हे २७ तरुणींच्या शोधात निघाली सोनाक्षी सिन्हा! ‘दहाड’चा जबरदस्त टीझर पाहिलात?

Dahaad Teaser Out: एक-दोन नव्हे २७ तरुणींच्या शोधात निघाली सोनाक्षी सिन्हा! ‘दहाड’चा जबरदस्त टीझर पाहिलात?

Apr 26, 2023, 03:26 PM IST

  • Dahaad Teaser Out: सोनाक्षी सिन्हाची डेब्यू सीरिज ‘दहाड’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस परिधान केलेल्या एका दमदार भूमिकेत दिसत आहे.

Dahaad Teaser Out

Dahaad Teaser Out: सोनाक्षी सिन्हाची डेब्यू सीरिज ‘दहाड’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस परिधान केलेल्या एका दमदार भूमिकेत दिसत आहे.

  • Dahaad Teaser Out: सोनाक्षी सिन्हाची डेब्यू सीरिज ‘दहाड’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस परिधान केलेल्या एका दमदार भूमिकेत दिसत आहे.

Dahaad Teaser Out: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'डबल एक्सएल' या चित्रपटानंतर पुन्हा एकदा पडद्यावर परतली आहे. यावेळी ती थिएटर नाही तर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर गाजवताना दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा 'दहाड' या वेब सीरिजमधून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे. या वेब सीरिजमध्ये ती आपला धाकड अंदाज दाखवणार आहे. ‘दहाड’च्या पोस्टरनंतर आता सोनाक्षी सिन्हाच्या या आगामी सीरिजचा टीझर देखील नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा पोलीस अधिकाऱ्याचा ड्रेस परिधान केलेल्या एका दमदार भूमिकेत दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट! जान्हवी आणि राजकुमारच्या 'माही' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

वयाच्या १७व्या वर्षी लग्नाची मागणी, मूल न करण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची लव्हस्टोरी

'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

सोनाक्षी सिन्हाची डेब्यू सीरिज ‘दहाड’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. बेपत्ता मुलींच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांपासून या टीझरची सुरुवात होते. या टीझरमध्ये सुरुवातीला असे सांगण्यात येते की, अशा २७ मुली बेपत्ता आहेत, ज्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही आणि कोणीही साक्षीदार नाही. या सर्व गुन्ह्यांच्या विरोधात एक महिला पोलीस अधिकारी उभी ठाकते. सोनाक्षी या हरवलेल्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणार आहे. ‘दहाड’चा हा ५२ सेकंदांचा टीझर प्राईम व्हिडीओने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘२४ बळी, १ पोलिस अधिकारी... आता तपास आता सुरू होईल'.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा प्राईम व्हिडीओद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. या पहिल्याच वेब सीरिजमध्ये ती पहिल्यांदाच पडद्यावर महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘दहाड’ ही वेब सीरिज फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि रीमा कागती आणि झोया अख्तर यांच्या प्रोडक्शनने संयुक्तपणे तयार केली आहे.

रीमा कागती आणि रुचिका ओबेरॉय या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना दिसणार आहेत. या वेब सीरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबतच प्रसिद्ध अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेता गुलशन देवय्या हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोनाक्षी सिन्हाच्या या वेब सीरिजच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पुढील बातम्या