मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Singer Alfaaz: मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला

Singer Alfaaz: मूसेवालानंतर आणखी एका पंजाबी गायकावर जीवघेणा हल्ला

Aarti Vilas Borade HT Marathi

Oct 03, 2022, 10:34 AM IST

    • Honey Singh Shares Post: हनी सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
अल्फाज (HT)

Honey Singh Shares Post: हनी सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

    • Honey Singh Shares Post: हनी सिंगने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाल्याच्या हत्येनंतर पंजाबी इंडस्ट्रीला धक्काच बसला. म्यूझिक इंडस्ट्रीसाठी हे सर्वात मोठे नुकसान होते. त्यापाठोपाठ आता पंजाबमधील आणखी एका गायकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. लोकप्रिय गायक हनी सिंगने याबाबत माहिती दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

शनिवारी रात्री पंजाबी गायक अल्फाजवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याना मोहाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रॅपर हनी सिंगने सोशल मीडियावर अल्फाजचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्यासोबतच गुन्हेगारांना शिक्षा देणार असे देखील त्याने म्हटले आहे.
पाहा: श्रेया बुगडेचा बोल्ड अंदाज, फोटो चर्चेत

हनी सिंगने अल्फाजचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अल्फाज हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत आहे. त्याच्या डोक्याला मार लागला आहे. फोटो पाहून अल्फाजची प्रकृती चिंताजनक असल्याचे जाणवत आहे. त्याचा फोटो शेअर करत हनी सिंगने, 'काल रात्री माझा भाऊ अल्फाजवर कोणी तरी हल्ला केला. ज्याने कोणी हा कट रचला त्याला मी सोडणार नाही. कृपया अल्फाजसाठी प्रार्थना करा' या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. अल्फाज आणि त्याचे काही मित्र मध्यरात्री मोहाली येथील लँडरन रोडवर असलेल्या एका ढाब्यावर गेले होते. जेवण सुरु असताना ढाब्याच्या मालकाने आणि एका व्यक्तीने पैशांवरुन भांडण झाले. ती व्यक्ती तेथून पळ काढत होती. तेवढ्यात अल्फाज त्या व्यक्तीच्या समोर आला. रागाच्या भरात त्या व्यक्तीने आणि त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांनी अल्फाजवर हल्ला केला. तातडीने अल्फाजला मोहाली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहाली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विभाग

पुढील बातम्या