मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shyam Benegal: राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्याम बेनेगल यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी; घरीच सुरूये डायलिसिस

Shyam Benegal: राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्याम बेनेगल यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी; घरीच सुरूये डायलिसिस

Mar 10, 2023, 02:16 PM IST

  • Shyam Benegal Health : राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

Shyam Benegal

Shyam Benegal Health : राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

  • Shyam Benegal Health : राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत.

Shyam Benegal Health : राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वैद्यकीय चाचणीत ही बाब समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असून, डायलिसिसही सुरू आहे. स्वत: श्याम बेनेगल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘सध्या प्रकृती खराब असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. माझे औषधोपचार सुरू आहेत. घरीच डायलिसिस केले जाते’, असे त्यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

मात्र, त्यांना किडनीशी संबंधित समस्या असल्याचे त्यांनी सांगितले नाही. ‘काही दिवसांपूर्वीपर्यंत सरांची तब्येत ठीक होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ते ऑफिसला येत नाहीत. सध्या ते त्यांच्या नव्या प्रकल्पांची आखणी करत होता. ते बांगलादेश सरकारसोबत 'मुजीब: द मेकिंग ऑफ अ नेशन' नावाचा चित्रपट बनवण्याची तयारी करत आहेत. हा चित्रपट बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती मुजीबूर रहमान यांच्या जीवनावर आधारित आहे. मात्र, वादांमुळे त्याचे प्रदर्शन सतत पुढे ढकलले जात आहे. मुजीब व्यतिरिक्त त्यांनी कोणताही प्रकल्प सुरू केलेला नाही’, असे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

श्याम बेनेगल यांनी केवळ चित्रपटच नाही, तर माहितीपट आणि जाहिरातीही बनवल्या आहेत. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, श्याम बेनेगल यांनी स्वतः सांगितले की, त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, किडनी निकामी झाल्याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही. काही दिवसांपूर्वीपर्यंत श्याम बेनेगल बरे असल्याचे त्यांच्या कार्यालयातील लोकांनी सांगितले. मात्र, सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत.

विभाग

पुढील बातम्या