मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade Health Update: ४८ तासानंतर श्रेयस तळपदेने दिला प्रतिसाद; कुटुंबाने दिली अभिनेत्याची हेल्थ अपडेट

Shreyas Talpade Health Update: ४८ तासानंतर श्रेयस तळपदेने दिला प्रतिसाद; कुटुंबाने दिली अभिनेत्याची हेल्थ अपडेट

Dec 16, 2023, 02:02 PM IST

  • Shreyas Talpade Health Update: श्रेयस तळपदे याची प्रकृती आता हळूहळू सुधारत असून, तो आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी म्हटल्याने चाहत्यांच्या जीव देखील भांड्यात पडला आहे.

Shreyas Talpade Health Update

Shreyas Talpade Health Update: श्रेयस तळपदे याची प्रकृती आता हळूहळू सुधारत असून, तो आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी म्हटल्याने चाहत्यांच्या जीव देखील भांड्यात पडला आहे.

  • Shreyas Talpade Health Update: श्रेयस तळपदे याची प्रकृती आता हळूहळू सुधारत असून, तो आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी म्हटल्याने चाहत्यांच्या जीव देखील भांड्यात पडला आहे.

Shreyas Talpade Health Update: अभिनेता श्रेयस तळपदे याची प्रकृती आता सुधारत असल्याचे त्याच्या कुटुंबाने माध्यमांना सांगितले आहे. एका वेबसाईटशी बोलताना श्रेयस तळपदे यांच्या कुटुंबाने म्हटले की, अभिनेत्याने ४८ तासानंतर कुटुंबीयांकडे पाहून स्माईल केले आहे. शनिवारी सकाळी अभिनेत्याने कुटुंबाकडे पाहून प्रतिसाद दिल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे. श्रेयस तळपदे याची प्रकृती आता हळूहळू सुधारत असून, तो आता डोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी म्हटल्याने चाहत्यांच्या जीव देखील भांड्यात पडला आहे. श्रेयसची पत्नी दीप्ती त्याच्या प्रकृतीची माहिती माध्यमांना देत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

अभिनेता श्रेयस तळपदे याच्या तब्येतीविषयी माहिती देताना त्याच्या कुटुंबातील एका सदस्याने म्हटले की, 'श्रेयस आता बरा आहे. तो हळूहळू बरा होत असून शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. आज सकाळी तो आमच्याकडे बघून हसला. त्यामुळे आम्हा सर्वांना दिलासा मिळाला आहे. तो स्वत: काही दिवसांत माध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधेल.' श्रेयस तळपदेच्या पत्नीने देखील एक निवेदन जारी करून अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट केले होते. काही दिवसांत अभिनेत्याला डिस्चार्ज मिळेल, असेही दीप्ती तळपदे हिने म्हटले आहे.

आगामी चित्रपटाचे शूटिंग करत असताना श्रेयस तळपदे याची तब्येत खराब झाली होती. त्याला तातडीने अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे हा सध्या त्याच्या आगामी 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होता. त्याने काही अ‍ॅक्शन सीन देखील शूट केले होते. शूटिंग संपवून श्रेयस तळपदे घरी परतला होता. यावेळी त्याने आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचे पत्नीला सांगितले. हे सांगत असतानाच तो अचानक बेशुद्ध होऊन पडला. यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुढील बातम्या