मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade Heart Attack: हार्ट अटॅकनंतर अँजिओप्लास्टी; हॉस्पिटलने दिली श्रेयस तळपदेच्या तब्येतीची अपडेट

Shreyas Talpade Heart Attack: हार्ट अटॅकनंतर अँजिओप्लास्टी; हॉस्पिटलने दिली श्रेयस तळपदेच्या तब्येतीची अपडेट

Dec 15, 2023 11:00 AM IST

Shreyas Talpade Heart Attack Health Update: एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना श्रेयस तळपदे याची तब्येत खराब झाली होती. अभिनेत्याला तातडीने अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Shreyas Talpade Heart Attack Health Update
Shreyas Talpade Heart Attack Health Update

Shreyas Talpade Heart Attack Health Update: अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका चित्रपटाचे शूटिंग करत असताना श्रेयस तळपदे याची तब्येत खराब झाली होती. अभिनेत्याला तातडीने अंधेरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता श्रेयस तळपदे याची तब्येत कशी आहे, याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे हा सध्या त्याच्या आगामी 'वेलकम टू जंगल' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. कालच्या दिवसांत त्याने काही अ‍ॅक्शन सीन देखील शूट केले होते. या दरम्यान अभिनेता सगळ्यांशी हसून खेळून शूटिंग करत होता. मात्र, यानंतर तो घरी पोहोचला आणि त्याची तब्येत बिघडली.

ट्रेंडिंग न्यूज

घरी पोहोचताच श्रेयस याने पत्नी दीप्तीकडे तब्येतीच्या कुरबुरीची तक्रार केली. तो अस्वस्थ वाटत असल्याचे सांगत असतानाच अचानक चक्कर येऊन पडला आणि बेशुद्ध झाला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. त्याच्या तब्येती संदर्भात माहिती देताना हॉस्पिटलने म्हटले की, 'श्रेयस तळपदे याच्यावर रात्री १०च्या सुमारास अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आता तो एकदम ठीक आहे. त्याची सर्जरी व्यवस्थित पार पडली असून, आता त्याची तब्येत सुधारत आहे. त्याला रात्री १०च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. आता त्याची तब्येत ठीक असून, काहीच दिवसांत त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे.'

अभिनेता श्रेयस तळपदे लवकरच 'वेलकम टू जंगल' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची शूटिंग सुरू झाली असून, श्रेयस देखील आपले सीन्स शूट करण्यात व्यस्त होता. मात्र, अचानक त्याची तब्येत बिघडली आणि त्याला चक्कर आली. त्याच्या तब्येतीबद्दल कळताच चाहते काळजीत पडले असून, अभिनेत्याला लवकरात लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना करत आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४