मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shreyas Talpade: कॅमेरामन श्रेयस तळपदेला म्हणालेला ‘पनवती’; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा!

Shreyas Talpade: कॅमेरामन श्रेयस तळपदेला म्हणालेला ‘पनवती’; अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा!

Jun 07, 2023, 04:10 PM IST

  • Shreyas Talpade At Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोमध्ये श्रेयस तळपदे हजेरी लावणार आहे. यावेळी श्रेयस देखील आपल्या मनातील खुपणाऱ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करणार आहे.

Shreyas Talpade

Shreyas Talpade At Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोमध्ये श्रेयस तळपदे हजेरी लावणार आहे. यावेळी श्रेयस देखील आपल्या मनातील खुपणाऱ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करणार आहे.

  • Shreyas Talpade At Khupte Tithe Gupte: छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोमध्ये श्रेयस तळपदे हजेरी लावणार आहे. यावेळी श्रेयस देखील आपल्या मनातील खुपणाऱ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करणार आहे.

Shreyas Talpade At Khupte Tithe Gupte: अभिनेता श्रेयस तळपदे याने आपल्या बहरदार अभिनयाने आणि दमदार आवाजाने सगळ्यांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. केवळ मराठीच नव्हे, तर श्रेयस तळपदे बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या गाजलेल्या चित्रपटाचे हिंदी डबिंग करण्यात श्रेयसचा महत्त्वाचा वाटा आहे, आज मनोरंजन विश्वात श्रेयस तळपदे याचं नाव अतिशय चर्चेत असतं. मात्र, त्याचा हा प्रवास फारच संघर्षमय होता. याचाच एक किस्सा त्याने नुकताच शेअर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

छोट्या पडद्यावरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोमध्ये श्रेयस तळपदे हजेरी लावणार आहे. यावेळी श्रेयस देखील आपल्या मनातील खुपणाऱ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस तळपदे आपल्या संघर्षाच्या दिवसांमधील एक किस्सा सांगताना दिसत आहे. तर, हा किस्सा सांगताना श्रेयस भावून देखील झाला आहे. मनोरंजन विश्वात आपल्यानंतर प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो. याचंच उदाहरण त्याने सांगितलं आहे.

या व्हिडीओमध्ये श्रेयस म्हणतो की, ‘सुरुवातीच्या दिवसात एका मालिकेच्या ऑडिशनसाठी मी गेलो होतो. सगळी तयारी केली होती. संवाद म्हणायला कॅमेरासमोर उभा राहिलो तोच कॅमेरामन मला थांबायला म्हणाला. कॅमेरात काहीतरी गडबड झाली आहे, असं तो म्हणाला. अर्धा-पाऊण तास प्रयत्न करूनही तो कॅमेरा ठीक झाला नाही. त्यामुळे वैतागून कॅमेरामन मला म्हणाला की, तू पनवती आहेस रे...’

मनातील हीच खदखद सांगताना श्रेयस पुढे म्हणाला की, ‘काय बोलणार...होतोच मी पनवती कदाचित.. कारण तेव्हा हाताला काहीच काम नव्हतं.’ ही आठवण सांगताना श्रेयस तळपदे भावूक झाला होता. श्रेयस तळपदेने मराठी मालिका, चित्रपट यासोबतच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने ‘इक्बाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘हाऊसफुल २’, ‘गोलमाल अगेन’ यासारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे.

विभाग

पुढील बातम्या