मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shiney Ahuja: ‘त्या’ एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं शायनी आहुजाचं संपूर्ण आयुष्य; बॉलिवूडमधून गुंडाळावा लागला गाशा!

Shiney Ahuja: ‘त्या’ एका चुकीमुळे उद्ध्वस्त झालं शायनी आहुजाचं संपूर्ण आयुष्य; बॉलिवूडमधून गुंडाळावा लागला गाशा!

May 15, 2023, 12:17 PM IST

  • Shiney Ahuja Birthday: शायनीने त्याच्या करिअरची सुरुवात २००५मध्ये ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ या चित्रपटातून केली होती. यानंतर त्याने ‘गँगस्टर’, ‘फना’, ‘वो लम्हें’, ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘खोया खोया चांद’ या चित्रपटांमध्ये काम केले होते.

Shiney Ahuja

Shiney Ahuja Birthday: शायनीने त्याच्या करिअरची सुरुवात २००५मध्ये ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ या चित्रपटातून केली होती. यानंतर त्याने ‘गँगस्टर’, ‘फना’, ‘वो लम्हें’, ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘खोया खोया चांद’ या चित्रपटांमध्ये काम केले होते.

  • Shiney Ahuja Birthday: शायनीने त्याच्या करिअरची सुरुवात २००५मध्ये ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ या चित्रपटातून केली होती. यानंतर त्याने ‘गँगस्टर’, ‘फना’, ‘वो लम्हें’, ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘खोया खोया चांद’ या चित्रपटांमध्ये काम केले होते.

Shiney Ahuja Birthday: शायनी आहुजाने बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश करताच आपल्या देखण्या व्यक्तिमत्वाने त्याने सगळ्यांचीच मने जिंकून घेतली होती. शायनी त्याच्या दमदार अभिनयामुळे देखील चर्चेत होता. मनोरंजन विश्वात एन्ट्री करताच तो लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला होता. राजबिंडा चेहरा, उत्तम फॅशन सेन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनयात इतका आत्मविश्वासू होता की, तो मोठ्या पडद्यावर लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला होता. पण, एका मोठया चुकीमुळे या अभिनेत्याला इंडस्ट्रीत जे स्थान मिळायला हवे होते, ते कधीच मिळू शकले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाचं केलं मतदान! म्हणाला ‘आता कॅनडा नाही माझा देश...’

लग्नाचा करार संपताच सायलीला झालीये अर्जुनवरील प्रेमाची जाणीव! ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

‘आरआरआर’ गाजवणाऱ्या ज्युनियर एनटीआरचं खरं नाव माहित आहे का? कसं मिळालं त्याला आजोबांचं नाव? वाचा...

ओठ सुजले अन् चेहराही बिघडला; छोट्या पडद्यावरच्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीला पाहून सगळ्यांनाच बसला धक्का!

२००९ मध्ये शायनी आहुजाच्या घरी काम करणाऱ्या त्याच्या १९ वर्षीय मोलकरणीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. हे प्रकरण खूपच गंभीर झाले होते. या प्रकरणी शायनीला तुरुंगात जावे लागले होते. २०११मध्ये या प्रकरणात त्याला ७ वर्षांची शिक्षा झाली. या घटनेतून शायनी कधीच बाहेर पडू शकला नाही आणि तो प्रसिद्धीच्या जगतापासून पूर्णपणे दूर गेला. मात्र, नंतर या प्रकरणात असा एक ट्विस्ट आला, की या मुलीने खटल्यादरम्यान तिच्या जबाबात सांगितले की, तिच्यावर कधीही बलात्कार झाला नाही. मात्र, ही तरुणी दबावाखाली असे बोलत असल्याच्या संशयावरून न्यायालयाने शायनीला शिक्षेत कोणतीही सूट दिली नाही आणि त्याला दोषी ठरवले.

Butterfly : खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी; आता मोठ्या पडद्यावरही एकत्र दिसणार अभिजीत अन् मधुराची जोडी!

२००८मध्ये आलेल्या 'भूल भुलैया' या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. याच चित्रपटात शायनी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. शायनीच्या या चित्रपटातील भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. शायनीने त्याच्या करिअरची सुरुवात २००५मध्ये ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ या चित्रपटातून केली होती. यानंतर त्याने ‘गँगस्टर’, ‘फना’, ‘वो लम्हें’, ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘खोया खोया चांद’ या चित्रपटांमध्ये काम केले होते. शायनीचा जन्म १५ मे १९७३ रोजी दिल्लीत झाला होता. या अभिनेत्याने आज वयाची ५० वर्षे पूर्ण केली आहेत.

मात्र, बलात्कार प्रकरणानंतर शायनी आहुजाने चित्रपट जगतापासून पूर्ण दुरावला. शिवाय तो प्रसिद्धीच्या जगतापासूनही दूर निघून गेला. या काळात अभिनेत्याने मोजकेच चित्रपट केले. यात ‘घोस्ट’ आणि ‘वेलकम बॅक’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. २०१५मध्ये ‘वेलकम बॅक’मध्ये दिसल्यानंतर शायनी आहुजाने स्वतःला बॉलिवूडपासून दूर केले. गेल्या ८ वर्षांत त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.

विभाग

पुढील बातम्या