मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shehnaaz Gill: अंबानींच्या इव्हेंटमध्ये करिश्मा-सोनमने शहनाजकडे केलं दुर्लक्ष! व्हिडीओची होतेय चर्चा

Shehnaaz Gill: अंबानींच्या इव्हेंटमध्ये करिश्मा-सोनमने शहनाजकडे केलं दुर्लक्ष! व्हिडीओची होतेय चर्चा

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 01, 2023, 01:04 PM IST

    • Jio World plaza launch Event: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करिश्मा आणि सोनम शहनाज गीलकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
Shehnaaz Gill

Jio World plaza launch Event: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करिश्मा आणि सोनम शहनाज गीलकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

    • Jio World plaza launch Event: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करिश्मा आणि सोनम शहनाज गीलकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने भारत देशातील सर्वात मोठा मॉल सुरु केला आहे. हा मॉल मुंबईत सुरु करण्यात आला आहे. या मॉलचा शाही उद्घाटन सोहळा ठेवण्यात आला होता. अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. दरम्यान, अभिनेत्री शहनाज गीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन सोनम कपूर आणि करिश्मा कपूरला ट्रोल केले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

'या' मालिकेत काम करत असताना एकता कपूरच्या सिनेमाने बदलले नुसरत भरुचाचे आयुष्य

मॉलच्या उद्घाटन सोहळ्याला अंबानी कुटुंबीयांनी भव्य रॅम्प वॉकचे आयोजन केले होते. या रॅम्प वॉकवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांचा जलवा दाखवताना दिसले. शहनाजने मॉलच्या उद्घाटन सोहळ्यात लाल रंगाचा ड्रेस परिधान करुन रँप वॉक केला. तिच्या या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. सर्वांनाच तिच्या या लूक फार आवडला.
वाचा: ‘बॉईज ४’चा बॉक्स ऑफिसवर धिंगाणा, रिलिजच्या १०व्या दिवशीही बक्कळ कमाई

दरम्यान, या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेत्री सोनम कपूर देखील हजर असल्याचे दिसत आहे. त्या दोघी गप्पा मारत असताना शहनाज तिथे आली. शहनाज त्या दोघींशी बोलते पण त्या दोघीही तिच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर शहनाजचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन करिश्मा आणि सोनमला चांगलेच सुनावले आहे.

शहनाजच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिचा 'थँक्यू फॉर कमिंग' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. मात्र, हा चित्रपट चर्चेत होता. त्यापूर्वी शहनाज 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात सलमान खानसोबत दिसत आहे.

'जिओ वर्ल्ड प्लाझा' या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये अनेक स्टार्सची देसी स्टाईल बघायला मिळाली. तर, काही कलाकार वेस्टर्न स्टाईलमध्ये कमाल दिसले आहेत. या इव्हेंटमध्ये रणवीर सिंह काळ्या रंगाची धोती पॅन्ट आणि कोटमध्ये दिसला होता. अभिनेत्री अथिया शेट्टी, वडील सुनील शेट्टीसोबत क्रॉप टॉप आणि प्रिंटेड कोट पँटमध्ये पोज देताना दिसली.

पुढील बातम्या