मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: प्रदर्शनाच्या ५० दिवसानंतरही ८०० चित्रपटगृहात 'पठाण'चे स्क्रिनिंग

Pathaan: प्रदर्शनाच्या ५० दिवसानंतरही ८०० चित्रपटगृहात 'पठाण'चे स्क्रिनिंग

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 15, 2023, 06:54 PM IST

    • Shah Rukh Khan: शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित होऊन ५० दिवस उलटले आहेत. तरीही ८०० चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा आजही दाखवला जातोय
शाहरुख खान (HT_PRINT)

Shah Rukh Khan: शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित होऊन ५० दिवस उलटले आहेत. तरीही ८०० चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा आजही दाखवला जातोय

    • Shah Rukh Khan: शाहरुख खानचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित होऊन ५० दिवस उलटले आहेत. तरीही ८०० चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा आजही दाखवला जातोय

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि अभिनेत्री दीपिका पादूकोणचा 'पठाण' हा चित्रपट रिलीज होऊन आत तब्बल ५० दिवस झाले आहेत. तरीही चित्रपटाची कमाई कमी झालेली नाही. आजही ८०० चित्रपटगृहांमध्ये पठाण हा चित्रपट दाखवला जात आहे. चाहत्यांमध्ये पठाणची क्रेझ कायम असल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'तिने केलेला त्याग, लोकांचे सोसलेले टोमणे...', आईने दिले अभिनेत्री हेमांगी कवीला सरप्राइज

वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

'तू गौरव मोरेला सर बोल', त्या कमेंटमुळे अभिनय बेर्डे याला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव च्या 'श्रीकांत' चा जलवा! शनिवारच्या कमाईत जबरदस्त वाढ

बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार आता ‘पठाण’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने एकूण ५११.७५ कोटींची कमाई केली आहे. तर, इतर भाषांमध्ये ५२९.४४ कोटींची कमाई झाली आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाईडमध्ये १०२९ कोटींचा टप्पा गाठला आहे. जगभरातील चाहते ‘पठाण’वर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
वाचा: ऑस्कर न मिळवणाऱ्यांनाही मिळतं बम्पर गिफ्ट! काय असतं 'त्या' १ कोटींच्या बॅगमध्ये? जाणून घ्या..

रिलीजच्या सहाव्या आठवड्यात या चित्रपटाने प्रभासच्या ‘बाहुबली २’चा बॉक्स ऑफिस विक्रम मोडला. त्यापूर्वी त्याने केजीएफ २चा रेकॉर्ड मोडला होता. ‘पठाण’ या चित्रपटातून बॉलिवूड किंग शाहरुख खान याने तब्बल चार वर्षानंतर मनोरंजन विश्वात पुनरागमन केले आहे. त्याचे हा कमबॅक चांगलाच हिट ठरला आहे. आता त्याच्या आगामी ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा हाय अ‍ॅक्शन पॅक्ड चित्रपट गेल्या महिन्यात २५ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला दमदार ओपनिंगही मिळाली होती. ‘पठाण’मध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली आहे. दीपिका पदुकोणनेही या चित्रपटात अॅक्शन सीन्स केले आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खानही कॅमिओ भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटाने जगभरात १ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘पठाण’ रिलीजच्या पहिल्या टप्प्यात १००० कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट ठरला आहे.

विभाग

पुढील बातम्या