मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar: ऑस्कर न मिळवणाऱ्यांनाही मिळतं बम्पर गिफ्ट! काय असतं 'त्या' १ कोटींच्या बॅगमध्ये? जाणून घ्या..

Oscar: ऑस्कर न मिळवणाऱ्यांनाही मिळतं बम्पर गिफ्ट! काय असतं 'त्या' १ कोटींच्या बॅगमध्ये? जाणून घ्या..

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 14, 2023 01:56 PM IST

Oscar Gift Bags: ऑस्करमध्ये नॉमिनेट झालेल्या प्रत्येकाला गिफ्ट दिले जाते. यावेळी या बॅगेची किंमत जवळपास १ कोटी रुपये आहे. मात्र हे गिफ्ट स्विकारताना समोरच्या व्यक्तीला एक रक्कम भरावी लागते.

ऑस्कर गिफ्ट २०२३
ऑस्कर गिफ्ट २०२३ (HT)

चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा 'ऑस्कर २०२३' नुकताच पार पडला. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या ९५व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विशेष स्थान पटकावले. तसेच भारताला दोन ऑस्कर देखील मिळाले. पण तुम्हाला माहिती आहे की ऑस्करसाठी नॉमिनेट झालेल्या प्रत्येकाला खास गिफ्ट मिळते. या गिफ्टची किंमत जवळपास १ कोटी रुपये असते.

ऑस्करमध्ये नॉमिनेट झालेल्या प्रत्येकाला दरवर्षी काही ना काही गिफ्ट दिले जाते. यंदा १२६००० डॉलर्सची एक बॅग गिफ्ट करण्यात आली आहे. हे गिफ्ट देण्यासाठी अकादमी खर्च करत नाही. हे गिफ्ट लॉस एंजलिसमधील मार्केटिंग कंपनी डिस्टिंक्टव असेट त्यांच्याकडून देते.
वाचा: आणि राजामौलींनी पत्नीला मिठी मारली! पाह ऑस्करमधील सोनेरी क्षण

काय काय असते बॅगमध्ये?

नॉमिनेट झालेल्यांना मिळत असलेल्या बॅगमध्ये ६० पेक्षा जास्त आयटम असतात. ज्यामध्ये ब्यूटी प्रोडक्ट्स, लाइफस्टाइल संबंधीत गिफ्ट, लग्झरी वेकेशन पॅकेज या सगळ्या गोष्टी असतात. ३३ लाख म्हणजे जवळपास ४०,००० डॉलरचे कॅनेडियन गेटअवेचे किट असते. लग्झरी वॅकेशन पासच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियाच्या क्वीसलँड आणि इटेलियन लाइट हाउसमध्ये आठ लोकांना राहण्याची संधी मिळते.

जर एखाद्या व्यक्तीला त्याचे घर रेनोवेट करायचे असले तर मेसन कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून २५००० डॉलर म्हणजे जवळपास २१ लाख रुपये काम करण्यासाठी मिळतात. यात आणखी लिपो आर्म स्कल्पटिंग, हेअर रेस्टोरेशन सर्विसेस आणि फेसलिफ्ट हे पॅकेज आहेत. यावेळी हे गिफ्ट सूटकेसमध्ये वाटण्यात आले. गिफ्ट बॅगमध्ये स्किनकेअर प्रोडक्ट देखील आहेत.

पण तुम्हाला माहिती आहे का हे इतके महागडे गिफ्ट स्विकारताना त्या कलाकाराला काही पैसे टॅक्स म्हणून सरकारला द्यावे लागतात. गिफ्ट देण्यात आलेल्या व्यक्तीला ते नाकारण्याचा पूर्णपणे अधिकार असतो. रिपोर्ट्सनुसार, गेल्यावर्षी डेंजल वॉसिंगटन आणि जेके सिम्मन्सने हे गिफ्ट चॅरिटीला दिले होते.

IPL_Entry_Point

विभाग