मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sanjay Dutt : ‘केजीएफ २’नंतर संजय दत्त पुन्हा बनणार व्हिलन! ‘या’ चित्रपटात दिसणार हटके लूक

Sanjay Dutt : ‘केजीएफ २’नंतर संजय दत्त पुन्हा बनणार व्हिलन! ‘या’ चित्रपटात दिसणार हटके लूक

Feb 01, 2023, 08:10 AM IST

    • Sanjay Dutt New Movie: ‘केजीएफ २’मध्ये संजय दत्तने ‘अधीरा’ होऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पुन्हा एकदा व्हिलन बनून तो मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.
Sanjay Dutt

Sanjay Dutt New Movie: ‘केजीएफ २’मध्ये संजय दत्तने ‘अधीरा’ होऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पुन्हा एकदा व्हिलन बनून तो मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.

    • Sanjay Dutt New Movie: ‘केजीएफ २’मध्ये संजय दत्तने ‘अधीरा’ होऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पुन्हा एकदा व्हिलन बनून तो मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.

Sanjay Dutt New Movie: बॉलिवूड आणि कन्नड चित्रपटांनंतर आता संजय दत्त तमिळ चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार आहे. 'थलापथी ६७' या चित्रपटामध्ये अभिनेता विजय मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याच्यासोबत व्हिलन बनून संजय दत्तही तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. ‘थलापती ६७’ हा चित्रपट लोकेश कनगराज दिग्दर्शित करत आहेत. संजय दत्त या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ‘केजीएफ २’नंतर संजय दत्त पुन्हा एकदा साऊथ चित्रपटामध्ये दिसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

‘केजीएफ २’मध्ये संजय दत्तने ‘अधीरा’ होऊन प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पुन्हा एकदा व्हिलन बनून तो मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. ‘थलापती ६७’ चित्रपटाचे सह-निर्माते जगदीश यांनी या चित्रपटातील संजय दत्तची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी संजयसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांप्रमाणेच संजय दत्त याने देखील आपला आनंद सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे.

दिग्दर्शक लोकेश कनगराज आणि थलापती विजय यांनी यापूर्वी ‘मास्टर’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतर ही जोडी ‘थलापती ६७’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येत आहे. ‘थलापती ६७’ हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस रिलीज होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थलापती ६७'साठी संजय दत्तला १० कोटी रुपये इतके मानधन देण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही आणि म्हणूनच या चित्रपटाला 'थलापती ६७' म्हटले जात आहे. हा एक अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे, ज्याचे दिग्दर्शन लोकेश कनागराज करणार आहेत. या चित्रपटाची कथा देखील लोकेश यांनीच लिहिली आहे.

विभाग

पुढील बातम्या